Sanjeev Kumar Book Launch : अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांची गनणा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये केली जाते. संजीव कुमार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'द अॅक्टर वी ऑल लव्हड' या बायोग्राफीचा आज मुंबईत प्रकाशन सोहळा पार पडला आहे. अनिल कपूरने (Anil Kapoor) या पुस्तकाचे प्रकाशन केले.
'द अॅक्टर वी ऑल लव्हड' हे पुस्तक लेखिका रीता रामामूर्ती गुप्ता आणि संजीव कुमार यांचा पुतण्या उदय जरीवाला यांनी लिहिले आहे. 'द अॅक्टर वी ऑल लव्हड' च्या प्रकाशनसोहळ्यादरम्यान अभिनेता अनिल कपूरनेदेखील हजेरी लावली होती. अनिल कपूरनेच या पुस्तकाचे प्रकाशन केले. दरम्यान अनिल कपूरने संजीव कुमार यांच्यासोबतचे अनेक किस्से शेअर केले.
संजीव कुमार यांच्या आठवणींना अनिल कपूरने दिला उजाळा
प्रकाशनसोहळ्यादरम्यान अनिल कपूरने दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला. सटल अभिनय, एखाद्या कामातले सातत्य अशा अनेक गोष्टी संजीव कुमार यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत, मनोरंजनसृष्टीतील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी संजीव कुमार यांच्याकडून अनिल कपूरला शिकता आल्या.
अनिल कपूर पुढे म्हणाला,"दिलीप कुमारने संजीव कुमारसोबत 1968 साली प्रदर्शित झालेल्या 'संघर्ष' या सिनेमात काम केलं होतं. त्यावेळी संजीव कुमार यांच्या अभिनयाने मी भारावला होतो. त्यावेळी दिलीप कुमारदेखील म्हणाले होते, संजीव कुमार हिंदी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत".
संबंधित बातम्या