Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) आजही लोक हा प्रश्न विचारतात की त्याने लग्न का केले नाही. त्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या पण कोणाशीही लग्नाची चर्चा झाली नाही. अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचं नाव जोडलं होतं, पण अद्यापही सलमान सिंगलच आहे. सलमानचं ज्या अभिनेत्रींशी नाव जोडलं होतं, त्या अभिनेत्रींनी देखील लग्न केलं.  अशाच एका अभिनेत्रीसोबत सलमानचं नाव जोडलं होतं. इतकच नव्हे तर त्या दोघांच्या लग्नाच्या देखील जोरदार चर्चा होत्या. 


अभिनेत्री संगीता बिजलानी आणि सलमान खान हे दोघेही लग्न करणार होते. पण त्यानंतर संगीतने अचानक लग्नाला नकार दिला. विशेष म्हणजे आजही संगीता आणि सलमान हे चांगले मित्र आहेत. अनेक सिनेमांमधून संगीता बिजलानी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. संगीता बिजलानी 90 च्या दशकातील चित्रपटांमध्ये सक्रिय होती आणि त्याच काळात सलमानसोबतच्या तिच्या अफेअरच्या किस्से समोर आले होते. अनेक रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की सलमान तिच्यासाठी खूप गंभीर होता. 


संगीता बिजलानीचे सलमानसोबत ब्रेकअप का झाले? 


सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या अफेअरबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांनी 1986 मध्ये डेटिंग सुरू केली आणि 1994 पर्यंत एकत्र राहिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान त्याचवेळी संगीतासोबत लग्न करणार होता. सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने अनेक मुलाखतींमध्ये याचा खुलासा केला आहे. त्या मैत्रिणींपैकी एक म्हणजे सोमी अली, जिने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत संगीता आणि सलमानचे नाते तुटण्याचे कारण सांगितले होते.


तिने म्हटलं होतं की, सलमान आणि संगीताचं लग्न जवळपास ठरलं होतं. लग्नपत्रिका वाटल्या गेल्या होत्या आणि तयारीही सुरू झाली होती पण संगीताला सलमानचे दुसरे अफेअर कळले आणि तिने लग्न मोडलं. त्यावेळी सलमानचे दुसरे अफेअर सोमी अलीसोबत असल्याचं म्हटलं जात होतं. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी तिने त्या काळातील प्रसिद्ध क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले.मात्र 2010 मध्ये ती त्याच्यापासून वेगळी झाली आणि आजही ती अविवाहित आहे.


कोण आहेत संगीता बिजलानी?


संगीता बिजलानीचा जन्म 9 जुलै 1960 रोजी एका सिंधी-हिंदू कुटुंबात झाला. तिने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली आणि त्या काळातील 'निरमा' आणि 'पॉन्ड्स' साबण सारख्या अनेक जाहिरातींमध्ये दिसली. मॉडेलिंगच्या काळात तिला 'बिजली' हे टोपणनाव देण्यात आले. 1980 मध्ये संगीता बिजलानी मिस इंडिया झाली. यानंतर तिने दक्षिण कोरियातील 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले.


संगीता बिजलानीने 1988 मध्ये 'कातिल' चित्रपटातून पदार्पण केले. मात्र त्रिदेव या चित्रपटातून तिला ओळख मिळाली आणि त्यानंतर संगीताला 'हथियार', 'जुर्म', 'योद्धा', 'इज्जत' आणि 'लक्ष्मण रेखा' सारखे चित्रपट करण्याची संधी मिळाली. तिने कन्नड चित्रपटसृष्टीतही काही चित्रपट केले आहेत. संगीता बिजलानीने कादर खानच्या कॉमेडी शो 'हंसना मत'मध्ये काही काळ काम केले आणि काही काळ 'किनारे मिलते नहीं' सारख्या मालिकाही केल्या.


ही बातमी वाचा : 


Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर, लॉरेन्स बिश्नोईसह अटक कलेल्या आरोपींविरोधातही मुंबई पोलिसांची कारवाई