मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफच्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाने यंदाच्या वर्षातील बॉक्स ऑफिसवरचे कमाईचे सर्व विक्रम मोडित काढण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. सिनेमाची धुवांधार कमाई सुरुच आहे. एका आठवड्यात 115 कोटींची कमाई केल्यानंतर सिनेमाने सोमवारीही धडाकेबाज कमाईचा विक्रम केला आहे. चित्रपटाने चार दिवसात तब्बल 151.47 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


सलमानच्या 'टायगर जिंदा है'ची पहिल्या दिवशी बंपर कमाई

यंदाचा वीकेण्ड ओपनर सिनेमा 'गोलमाल अगेन'चा विक्रम 'टायगर जिंदा है' ने मोडला. तर चित्रपटाने सोमवारीही शानदार कमाई केली. ख्रिसमसच्या मुहूर्तावर सिनेमाने 39.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा बॉलिवूड सिनेमांच्या सोमवारच्या कमाईचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे.

ट्रेड मॅग्झिन आणि फोर्ब्सने चार दिवसांत 154 कोटी रुपयांच्या कमाईचा अंदाज लावला होता. मात्र 'टायगर जिंदा है'ने शुक्रवारी 34.10 कोटी, शनिवारी 35.30 कोटी, रविवारी 45.53 कोटी आणि मंगळवारी 36.54 कोटी अशाप्रकारे एकूण 151.47 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

सलमानच्या 'टायगर जिंदा है'चे पोस्टर जाळले

4 हजारपेक्षा जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या 'टायगर जिंदा है'चं बजेट सुमारे 150 कोटी रुपये आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसांतच चित्रपटाचा संपूर्ण खर्च वसूल झाला आहे.