Salman Khan Firing Case Update : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी बिश्नोई गँगच्या एका सदस्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आता पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी घेतल्याचे म्हटले आहे.


पनवेलमध्ये सलमान खानच्या हत्येचा कट


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अंडरवर्ल्डची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचं लक्ष्य आता अभिनेता सलमान खान असल्याचं मानलं जात आहे. त्याला वारंवार धमक्या मिळत आहे. सलमान खानला त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसजवळ मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.


समोर आलं पाकिस्तान कनेक्शन


आरोपींनी पाकिस्तानातून AK 47, AK 92 आणि M 16 ही आधुनिक हत्यारे विकत घेण्याची योजना आखली होती. ज्या हत्याराने पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आली होती, तेच हत्यार या प्रकरणात वापरण्याची तयारी सुरु होती. आरोपी पाकिस्तानातून AK 47, AK 92 आणि M 16 ही आधुनिक हत्यारे विकत घेणार होते, ज्याचं ॲडवान्स पेमेंटही देण्यात आलं होतं.


सलमान मारल्यानंतर पळण्याचा प्लॅनही तयार होता


पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे की, आरोपींनी सलमान खानला मारण्यासाठी 18 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवलं होतं. हे शूटर पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे येथील असून ते गुजरातमध्ये लपून बसले आहेत. सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी स्वतःचा स्किप प्लॅन बनवला होता, त्यानुसार सलमान खानला मारल्यानंतर सर्वांना कन्याकुमारी येथे एकत्र येण्यास सांगण्यात आलं होतं, असंही चार्जशीटमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


"...नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट होईल", सुपरस्टार अभिनेत्याला पुन्हा एकदा धमकी; कोट्यवधी रुपयांची मागणी