Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Billi Billi Song : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या  (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील 'नय्यो लगदा' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्यामधील सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde)  यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता  'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटातील 'बिल्ली बिल्ली' (Billi Billi Song)  हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे. सलमाननं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन या नव्या गाण्याबद्दल चाहत्यांना सांगितलं.


सलमाननं शेअर केला व्हिडीओ


सलमाननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दोन मांजरी दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला  सुखबीर यांच्या आवाजातील बिल्ली बिल्ली गाणं ऐकू येतंय. सलमाननं हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझं  'किसी का भाई किसी की जान'  चित्रपटातील गाणं 2 मार्चला रिलीज होत आहे.' सलमानच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. सलमाननं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


पाहा व्हिडीओ






किसी का भाई किसी की जान 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस 


21 एप्रिल 2023 रोजी 'किसी का भाई किसी की जान'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे. 'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटाची सलमानचे चाहते उत्सकतेने वाट बघत आहेत.


सलमानचे आगामी चित्रपट


'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबरोबरच सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. किक-2  तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


महत्वाच्या इतर बातम्या: 


Salman Khan: कुणी म्हणतंय, 'पीटी टीचर' तर कुणी म्हणतंय, 'मुर्गी वाली डान्स स्टेप'; 'नय्यो लगदा' गाण्यामुळे सलमान खान ट्रोल