Salman Khan Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य सध्या तळोजा कारागृहात आहेत. याच कारागृहात अंडरवल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याच्या टोळीचे सदस्यही असून दाऊद टोळीच्या सदस्यांकडून बिष्णोई गँगच्या सदस्यांना धमकावलं जात असल्याचे समोर आलं आहे. तसं पत्रच बिष्णोई गँगच्या अटकेत असलेले सदस्यांच्या कुटुंबियांनी गृहविभागाचे मुख्य सचिवांना लिहिलं आहे.
बिष्णोई गँगच्या म्होरक्यांना तुरुंगात दाऊद गँगची भीती
अभिनेता सलमान खान याच्या घरावर केलेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली होती. यातील अनुज थापन यांचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. दरम्यान, गुप्ता आणि पाल यांना दाऊद टोळीच्या सदस्यांकडून तुरुंगात धमकावलं जात आहे. सलमान खानच्या घरावर केलेल्या हल्याप्रकरणी हा दबाव टाकला जात असल्याचा आरोप आरोपीद्वारे करण्यात आलेल्या पत्रातून करण्यात आला आहे.
सलमान खान गोळीबार प्रकरणात दोघे अटकेत
आरोपी विकी गुप्ताचा भाऊ शाह गुप्ता याने काही दिवसांपूर्वी तुरूंगात विकीची भेट घेतली होती. त्यावेळी विकी गुप्ताने दाऊद टोळीशी संबधित काही सदस्यांनी त्याला धमकावल्याचं सांगितलं. या प्रकरणी शाह गुप्ता यांनी जेल प्रशासन, गृहविभाग, आणि बिहार सरकारला पत्र लिहून याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तर, दुसरा आरोपी सागर पाल याचा भाऊ राहुल पाल यानेही अशाच प्रकारे पत्र लिहून ही भीती व्यक्त केली आहे.
बिष्णोई गँगला दाऊदची भीती
या पत्रात राहुल याने पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झालेल्या अनुज थापंन यांच्या मृत्यूकडे बोट दाखवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत दोन्ही आरोपींना दाऊद टोळीकडून असलेला धोका लक्षात घेऊन तुरूंगात सुरक्षीत ठिकाणी व्यवस्था करावी अशी पत्र लिहून मागणी केली आहे.
गायक एपी ढिल्लनच्या घरावर गोळीबार, सलमान खान आहे कारण?
प्रसिद्ध गायक एपी धिल्लन यांच्या घरावर वेगाने गोळीबार सुरू होता. 9 ऑगस्ट रोजी एपी ढिल्लॉनचा ओल्ड मनी विथ सलमान खान हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. सलमान खानसोबतच्या या मैत्रीमुळे लॉरेन्स गँग नाराज झाल्याचं बोललं जात आहे आणि याच व्हिडीओमुळे गायक एपी ढिल्लनच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याआधी प्रसिद्ध पंजाबी चित्रपट अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवाल याच्या कॅनडात घरावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळे धमकी देण्यात आली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :