Aamir Khan on Casting Sakshi Tanvar: आमिर खानची सुपरहिट फिल्म ‘दंगल’ प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करते. या चित्रपटात आमिरने कुस्तीपटू महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारली होती, तर त्यांच्या पत्नी दया कौरची भूमिका अभिनेत्री साक्षी तंवर हिने उत्कृष्टरीत्या साकारली. पण साक्षीला या भूमिकेसाठी कसं निवडलं गेलं, याचा खुलासा स्वतः आमिर खानने(Amir Khan) केला आहे आणि त्याने याचं पूर्ण श्रेय आपल्या आईला दिलं आहे. (Bollywood)

Continues below advertisement

आईमुळे सुचली आमिरला आयडिया...

आमिर खान प्रोडक्शन्सकडून जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये आमिर म्हणतो, "एके दिवशी अचानक माझ्या मनात साक्षी तन्वरचा विचार आला. मला माहित नाही का.पण आई टीव्हीवर तिचे सीरियल्स पाहायची आणि तिला साक्षी खूप आवडायची. तिथूनच मला कल्पना आली की साक्षी या भूमिकेसाठी योग्य ठरेल.”

आमिर पुढे सांगतो, “मी दिग्दर्शक नितेश तिवारी यांना सुचवलं  ‘आपण साक्षीजींना ट्राय करूया का?’ आणि जेव्हा ती सीनसाठी समोर आली, तेव्हा सगळेच थक्क झाले. तिचं नैसर्गिक अभिनय कौशल्य कमालच होतं.”तो पुढे म्हणाला, "जेव्हा चित्रपटाचा सीन बनवला गेला तेव्हा सगळेच  थक्क झाले. तो म्हणाला, 'तू काय केलेस? मला ते अजिबात अपेक्षित नव्हते.' आमिर पुढे म्हणाला, 'खरं तर, साक्षीला या रोलसाठी घेणं ही माझी कल्पना होती. माझ्या आईला ती टीव्हीवर खूप आवडायची, म्हणून मी नितेश जींना म्हणालो, 'आपण साक्षीजींना वापरून पाहू का?'

Continues below advertisement

साक्षी तंवरची प्रतिक्रिया

साक्षी तंवरनेही या भूमिकेबाबत आपला अनुभव सांगितला. ती म्हणाली, “जेव्हा मला सांगितलं गेलं की हा रोल माझ्यासाठी आहे, तेव्हा मला विश्वासच बसला नाही. कारण अशी जोडी आमिर आणि मी... हे स्वप्नवत होतं.”साक्षी पुढे म्हणाली की, “‘दंगल’ मिळण्यापूर्वी मला अनेक टीव्ही शोजचे ऑफर्स आले होते, पण मी सगळे नाकारले. नंतर लक्षात आलं की ते सगळं काही कारणानेच घडत होतं कारण माझ्यासाठी ‘दंगल’सारखा रोल लिहिला गेला होता.”

आमिरची साक्षीबद्दल स्तुती

आमिर खानने साक्षीच्या अभिनयाचं कौतुक करताना म्हटलं, “ती अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिचं स्क्रीन प्रेझेन्स, डायलॉग डिलिव्हरी आणि भावनिक ताकद विलक्षण आहे. साक्षीशिवाय दया कौरची भूमिका इतकी प्रभावी झाली नसती.” आमिर खानने साक्षी तंवरच्या अभिनयाची मनापासून प्रशंसा केली. तो म्हणाला, “साक्षी कमाल आहे! ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. तुम्ही तिला अगदी छोटासा बदल सांगितला तरी ती तो लगेच समजून घेते आणि परिपूर्णपणे साकारते. हे केवळ कौशल्य नाही, ती प्रत्येक गोष्ट मनापासून करते.” आमिरने या संपूर्ण अनुभवाला “युनिव्हर्सची जादू” असं संबोधलं. तो म्हणाला, “हे सर्व काही आपोआप घडलं. जसं एखादं कोडं स्वतःहून पूर्ण होतं तसं. एके दिवशी, जणू Universe च्या कृपेने मी ‘दंगल’चा भाग झालो.”