मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. 'सचिन-अ बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा 26 मे 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विटरवर सिनेमाचं पोस्टर शेअर करुन प्रदर्शनाच्या तारखेचाही उलगडा केला आहे.

सचिन... सचिन... तो आवाज मोठ्या पडद्यावर घुमणार!

'सचिन-अ बिलियन ड्रीम्स'चा टीझर 14 एप्रिल 2016 मध्ये रिलीज झाला होता. पण सिनेमा कधी रिलीज होणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती.

अखेर खुद्द सचिन तेंडुलकरने हा सस्पेन्स संपवला असून प्रदर्शनाच्या तारखेची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.

https://twitter.com/sachin_rt/status/831047602959441923

चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना सचिन तेंडुलकरने लिहिलं आहे की, "सर्व जण मला जो प्रश्न विचारत होते, त्याचं उत्तर हे आहे. कॅलेंडरवर खूण करुन ही तारीख लक्षात ठेवा."

या चित्रपटात खुद्द सचिन तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुंबईतील ‘200 नॉट आऊट’ या प्रॉडक्शन कंपनीने हा चित्रपट बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे.