आता भारतीय समाजात सरळ सरळ दोन भाग पडलेले दिसू लागले आहेत. एक गट सुशांतसिंग राजपूतसाठी न्याय मागताना रियाला दोषी ठरवतो आहे. आणि दुसरा गट सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा सखोल तपास करण्याची मागणी करतानाच रियाच्या बाजूने उभा ठाकलेला दिसतो आहे. सोशल मीडियावर त्याबद्दलच्या अनेक गमतीजमती पाहायला मिळू लागल्या आहेत. त्यातली एक गम्मत आहे रियाच्या 8 वर्षापूर्वीच्या ट्विटची.
रिया चक्रवर्तीचे वडील सैन्यात होते ही आता बातमी राहिलेली नाही. पण आठ वर्षांपूर्वी मात्र ते सैन्यात होते. त्यांची पोस्टिंग होती नागालँडमध्ये. त्याचा संदर्भ देत रियाने 15 जानेवारी 2012 मध्ये एक ट्विट केलं होतं. त्यात ती To my dad whose in Nagaland, guarding the borders for you and me.. And many others.. I salute to the Indian army असं म्हणते. माझे वडील नागालँडमध्ये असून आपल्यासाठी ते आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करत असल्याचं म्हटलं आहे. त्याचेवळी तिने भारतीय सैन्याला सलामही या ट्विटमधून केला होता.
गंमतीचा भाग असा की जवळपास 8 वर्षानंतर रियाचं हे ट्विट व्हायरल होतं आहे. अनेकांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट्स काढले आहेत. आणि ते व्हायरल केले आहेत. तर अनेकांनी ते रिट्विट करत आपली पोस्ट केली आहे. रियाच्या समर्थनार्थ अनेक लोक एकत्र येत असून तिची इमेज खरी कशी आहे हे दाखवण्यासाठी हे प्रयत्न चालू असल्याचं कळतं.
रियाचे समर्थक होतायत ट्रोल
रियाचे समर्थक वाढत असले तरी सुशांतसिंग राजपूत आणि तिच्या कुटुंबियांच्या बाजूने असणाऱ्या समर्थकांचं प्रमाण जास्त आहे. साहजिकच रियाचे समर्थक ट्रोल होताना दिसू लागले आहेत. जस्टिस फॉर रिया म्हणजे बहन मेरा नाम मत लेना हेच असल्याचं बोललं जातंय. विशेष बाब अशी की याचा एक हॅशटॅगही आता तयार करण्यात आला आहे. सुरूवातीच्या काळात रिया चक्रवर्तीवरच संशयाच्या सगळ्या सुया होत्या. आजही आहेतच. कारण रिया कुठेच काही बोलली नव्हती. मात्र, रियाने आपली बाजू एका वाहिनीसमोर मांडल्यानंतर रियाच्या बाजूनेही काही लोक उभे राहताना दिसू लागले. त्याच परिणाम म्हणून जस्टिस फॉर रिया हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला आहे.
Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीला जामीन की तुरुंगवारी अटळ?