Riteish Deshmukh Tujhe Meri Kasam Movie : महाराष्ट्रातील सिनेप्रेमींचे लाडके दादा-वहिनी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख (Genelia Deshmukh) यांनी एकत्र काम केलेला पहिला चित्रपट 'तुझे मेरी कसम' पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता हा चित्रपट तब्बल 21 वर्षांनी पुन्हा एकदा रिलीज होत आहे. अभिनेता रितेश देशमुखने आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून ही माहिती दिली.  हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 


सध्या काही जुने गाजलेले बॉलिवूड चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केले जात आहे. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेप्रेमी या चित्रपटांसाठी गर्दी करत आहेत.  आता, रितेशचा पहिला चित्रपट 'तुझे मेरी कसम' पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट 3 जानेवारी 2003 रोजी  थिएटरमध्ये रिलीज झाला होता. कॉलेजवयीन तरुणाची प्रेमकथा यामध्ये होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्याशिवाय,गाणीदेखील त्यावेळी लोकप्रिय झालेली. रामोजी राव हे या चित्रपटाचे निर्माते होते. तर, के. विजय भास्कर यांनी ‘तुझे तेरी कसम’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. 






टीव्ही चॅनेल, ओटीटीवर रिलीज नाही...


'तुझे मेरी कसम' हा चित्रपट टीव्हीवर अथवा ओटीटीवर रिलीज करण्यात आला नाही. हा चित्रपट थिएटरमध्येच रिलीज करण्यात आला होता. चित्रपटाचे सॅटेलाईट अथवा डिजीटल हक्कांची विक्री निर्मात्यांनी केली नाही. त्यामुळे हा चित्रपट टीव्ही चॅनेल अथवा ओटीटीवर प्रसारीत झाला नाही. 


रितेश-जेनेलियासाठीही खास आहे चित्रपट


हा चित्रपट रितेश-जेनेलियासाठीदेखील खास आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान त्यांच्यात प्रेम जुळले होते. त्यानंतर जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. 'तुझे मेरी कसम' चित्रपटात रितेश देशमुख, जेनेलिया डिसुझा यांच्यासह श्रिया सरन, सतीश शहा, सुप्रिया पिळगावंकर, सुषमा सेठ, शक्ती कपूर, असरानी, जसपाल भट्टी आदींच्या भूमिका आहेत. 


इतर संबंधित बातम्या...