Richa chadha: सध्या दिल्लीवर प्रदुषणाच्या धुराची चादर आहे. सध्या दिल्लीच्या प्रदुषणाची पातळी जीवघेणी होत चालली आहे. शाळा बंद झाल्या आहेत. दिल्लीत श्वास घेणं ही २०सिगारेट ओढण्याच्या बरोबर असल्याचे रिपोर्ट येतायत. दरम्यान, दिल्लीत एका लग्नसमारंभात फटाके फोडण्यात आले. याचा व्हिडिओ रिपोस्ट करत बॉलिवूडची अभिनेत्री रिचा चढ्ढानं सोशल मीडियावर हे पाहून स्वत:बद्दल उदासिनता आणि द्वेष वाटल्याचं ती म्हणाली. आपण स्वत:बद्दल बोलायला शिकत नाही तोपर्यंत राजकारणी काहीच करणार नाहीत.असंही तिनं या पोस्टखाली म्हटलंय.


दिल्लीला प्रदुषणाचा विळखा, रिचाची पोस्ट चर्चेत


दिल्लीला सध्या प्रदुषणाचा विळखा बसलाय. दिवाळी आणि लग्नसमारंभात फटाके फोडल्याने ही परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे. रिचा चड्ढाने X वापरकर्त्याच्या एका पोस्टला उत्तर दिल्याचं दिसलं.. घर धुक्याच्या जाड थरात झाकलेलं असताना फटाके फोडण्याचा व्हिडिओ वापरकर्त्याने शेअर केला होता.दिल्लीत अनेक भागात AQI पातळी 1000+ वर पोहोचली आहे,जी आरोग्यासाठी धोकादायक आहे. 


 






रिचा म्हणाली, मृत्यू दंडाला दिल्लीत जगणं म्हटलं जातं. माझ्या बालपणीचं शहर. माझी शाळा, माझी मुळं...स्वत:बद्दलची उदासिनता आणि तीव्र द्वेष पाहून माझं हृदय पिळवटलंय. आपण जोपर्यंत स्वत:साठी बोलायला शिकत नाही, तोपर्यंत राजकारणी काहीच करणार नाहीत.असं लिहत रिचानं ही पोस्ट केली आहे.  रिचानं तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून, रिचाने मूळतः एका वापरकर्त्याने पोस्ट केलेला व्हिडिओ रिट्विट केला. याव्हिडिओत दिल्लीला श्वास घ्यायला त्रास होत असताना लोक फटाके फोडत असल्याचे चित्रित केले आहे. व्हिडिओसह, तिने तिच्या हृदयाच्या जवळ असलेल्या शहरातील प्रदूषणाच्या भीषण वास्तवावर प्रकाश टाकणारा एक भावनिक संदेश लिहिला.


बाळाच्या आगमनासाठी ब्रेकनंतर रिचा या सिनेमाच्या तयारीत


रिचा चड्ढा काही महिन्यांपर्वी प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळीच्या हीरामंडी: द डायमंड बाजारमध्ये दिसली होती. या सिरिजनंतर तिने कामातून ब्रेक घेतला होता. रिचा तिचा पती अली फजलसोबत आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केले. बाळ झाल्यापासून तिने मातृत्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला. होता. आता रिचा तिच्या पुढच्या, अभी तो पार्टी शुरू हुई हैच्या रिलीजच्या तयारीत ती परत आली आहे.