Rashmika Mandanna: बॉलीवूडमध्ये काही दिवसांपूर्वी कामाच्या तासांवरून अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपला रोखठोक मत मांडल्यानंतर गदारोळ निर्माण झाला होता . तिने अनेक पुरुष कलाकार आठ तास काम करत असल्याचा दाखला देत इंडस्ट्रीतल्या ढोंगीपणावर बोट ठेवलं होतं . दीपिकानंतर आता साउथ आणि बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री  रश्मिका मंदाना हिने कामाच्या तासांवरून आपलं मत मांडलं आहे .

Continues below advertisement

साऊथ आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या नव्या चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याआधी ती ‘थामा’ या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटात ती अभिनेता धीक्षित शेट्टी सोबत झळकणार आहे. प्रमोशनदरम्यान रश्मिकाने फिल्म इंडस्ट्रीतील 8 तासांच्या कामाच्या वेळेवर सुरू असलेल्या वादाबाबत आपलं मत मांडलं आहे.

"9 ते 6 शेड्यूल असणं गरजेचं!" (Rashmika Mandanna)

एका मुलाखतीत रश्मिकाने सांगितलं, “मी खूप जास्त काम करते आणि मला वाटतं की हे योग्य नाही. सगळ्यांनी स्वतःसाठी योग्य असं वेळापत्रक ठरवायला हवं. 8 तास, 9 किंवा 10 तास काम करा, पण त्यानंतर स्वतःला वेळ द्या. मी अलीकडेच कामाच्या तासांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. मला वाटतं की इंडस्ट्रीने ‘9 ते 6’ चं वेळापत्रक स्वीकारायला हवं. त्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञ दोघांच्याही आयुष्यात समतोल राखता येईल.”

Continues below advertisement

8 तासांच्या शिफ्टचा वाद कसा सुरु झाला?

अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या मुलीच्या जन्मानंतर 8 तासांच्या शिफ्टची अट ठेवली होती. मात्र, ती अट पूर्ण न झाल्याने तिने ‘स्पिरिट’ हा चित्रपट सोडला. त्यानंतर हा विषय संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चेचा विषय बनला असून अनेक मोठ्या कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘द गर्लफ्रेंड’ कधी रिलीज होणार?

रश्मिका मंदानाचा आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’7 नोव्हेंबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती धीक्षित शेट्टीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

रश्मिकाची लव्ह लाइफही चर्चेत

कामासोबतच रश्मिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिने अभिनेता विजय देवरकोंडासोबत साखरपुडा केल्याची चर्चा आहे. एका व्हिडीओमध्ये ती एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसली होती.

आठ तासांच्या शिफ्टविषयी दीपिकाचे मत

बऱ्याच काळानंतर, अभिनेत्रीने तिच्यावरील सर्व आरोपांवर मौन सोडले आहे. CNN-TV18 सोबत बोलताना या सर्व आरोपांवर आपली मते व्यक्त केली. तिने इंडस्ट्रीतील ढोंगीपणावर लक्ष वेधलं. ती म्हणाली, "एक स्त्री म्हणून जर यामुळे दबाव आल्यासारखे वाटत असेल, तर तसेच होऊ द्या. पण हे काहीतरी नवीन नाही की भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार, पुरुष कलाकार, अनेक वर्षे फक्त आठ तास काम करत आहेत आणि त्यामुळे ते कधीही बातम्यांच्या मथळ्यामध्ये  दिसले नाहीत.

तिने पुढे सांगितले की, "मी सध्या कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही आणि ह्या प्रकरणाला मला इतकं मोठं बनवायचं नाही. पण अनेक पुरुष कलाकार सोमवार ते शुक्रवार फक्त आठ तास काम करतात, वीकेंडला काम करत नाहीत. भारतीय फिल्म इंडस्ट्रीला 'इंडस्ट्री' म्हणतात, पण खरी परिस्थिती खूप अव्यवस्थित आहे. आता वेळ आली आहे की योग्य व्यवस्थापन आणि स्ट्रक्चर आणले पाहिजे."