Animal First Look:  बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. न्यू ईयरच्या निमित्ताने साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी ''अॅनिमल'' चित्रपटामधील रणवीर कपूरच्या लूकचा पोस्टर रिलीज केले आहे. तेव्हापासून रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' (Animal) चित्रपटाच्या पोस्टरची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. ट्रोलर्स अॅनिमलमधील रणवीरच्या या लूकची तुलना 'शमशेरा' चित्रपटाशी करुन रणवीरला ट्रोल करत आहेत. 


न्यू ईयरच्या निमित्ताने रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा पोस्टर मेकर्सने रात्री 12 वाजता रिलीज केला आहे. मध्यरात्री 'अॅनिमल'चे  पोस्टर रिलीज होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर अॅनिमलचे पोस्टर शेअर केले आहे.


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


अनेक नेटकऱ्यांनी 'अ‍ॅनिमल'चं पोस्टर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाची तुलना 'शमशेरा' चित्रपटाशी केली. 'साऊथ चित्रपटाची स्वस्त कॉपी' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली, तर दुसऱ्या युझरनं कमेंट करुन लिहिलं, 'हा तर शमशेरा-2 वाटत आहे.'


'अनिमल'  या चित्रपटात पहिल्यांदाच साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूर यांची जोडी दिसणार आहे. यासोबतच 'कबीर सिंग' आणि 'अर्जुन रेड्डी' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 



काही महिन्यांपूर्वी रणबीरचा शमशेरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  रणबीर कपूरने 'शमशेरा'  चित्रपटासाठी 20 कोटी रुपयांचं मानधन घेतलं  होते.  चित्रपटातील रणबीरच्या बॉडी आणि लूकन अनेकांचे लक्ष वेधले या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा करण मल्होत्राने सांभाळली आहे. 150 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटाची निर्मिती यशराजच्या बॅनरखाली करण्यात आली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Animal First Look : रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाची रिलीज डेट जाहीर; पोस्टर आऊट