Ram Kadam On Adipurush Movie: आदिपुरुष  (Adipurush) या चित्रपटावर आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी  टीका केली आहे. 'हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही.' असं ट्वीट राम कदम यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आदिपुरुष या चित्रपटात देवदेवतांचं विडंबन केलं आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. 


राम कदम यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. तुटपुंजी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आदिपुरुष चित्रपटात निर्मात्यांनी आपल्या देवी देवींचे विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे. त्यांनी माफीनामा द्यावा.'






'चित्रपटाची दृष्य कट करुन काही होणार नाही. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तसेच जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काही वर्षांसाठी बॅन केलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात असे करण्याचे धाडस कोणी करणार नाही.' असही राम कदम यांनी ट्वीटमध्ये लिहिलं. 






आदिपुरुषच्या टीझरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 


आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन  ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. या टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Adipurush Controversy: 'पात्र जर श्रीलंकेचं असेल, तर ते मुघलांसारखं दिसता कामा नये!'; 'आदिपुरुष'च्या टीझरवर दीपिका चिखलिया यांची प्रतिक्रिया