RaanBaazaar : 'रानबाजार' (RaanBaazaar) या वेबसिरीजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वेबसिरीजची कथा तर उत्तम आहे. परंतु या कथेला सत्यात उतरवायचं काम या वेबसिरीजमधील दमदार कलाकारांनी केलं आहे. या वेबसिरीजला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत आहेत. आता पर्यंत या वेबसिरीजचे पाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रेक्षकांना पुढील भागाची उत्सुकता आहे. पुढील भाग येत्या 3 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 


तगडी स्टारकास्ट असलेली वेबसीरिज


प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या वेबसिरीजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या आणि अनुभवी कलाकारांचा समावेश आहे. यात तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे,  वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे नावाजलेले कलाकार दिसत आहेत.


पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या वेबसीरिजमध्ये मोहन आगाशे यांनी सतीश नाईक हे पात्र साकारले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब साकारली आहे. तर मकरंद अनासपुरे या वेबसीरिजमध्ये दिवेकर ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. ते अगदी अनुभवी राजकारण हलवणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर दिग्दर्शक अभिजित पानसे हे पहिल्यांदा अभिनय करताना दिसत आहेत. त्यांनी इन्स्पेक्टर चारुदत्त मोकाशी ही भूमिका साकारली आहे. 


तगड्या कलाकारांनी अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मनं


मोहन जोशी सयाजी पाटील यांच्या भूमिकेत दिसत आहेत. सचिन खेडेकर युसुफ पटेल साहेब ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर वैभव मांगलेंनी इस्पेक्टर पालांडे यांची भूमिका साकारली आहे. उर्मिला कोठारे यांनी निशा जैन ही व्यतिरेखा साकारली आहे. माधुरी पवार ही सयाजी पाटील यांची मुलगी प्रेरणा सयाजीराव पाटील या व्यक्तिरेखेत दिसत आहे. 'रानबजार' मध्ये आपल्याला कलाकारांचा दमदार अभिनय देखील पाहायला मिळेल. या सर्व तगड्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.


संबंधित बातम्या


RaanBaazaar : 'रानबाजार' ला प्रेक्षकांची पसंती; नवा भाग 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Raan Baazaar : 'रानबाजार' वेबसीरिजमुळे माधुरी पवार चर्चेत; जाणून घ्या काय आहे कारण?