R Madhavan On Vedat Marathe Veer Daudle Saat : प्रतापराव आणि त्यांच्या शिलेदारांचाअतुलनीय पराक्रम दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) या मराठी सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. या सिनेमात सुपस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या भूमिकेसाठी आर.माधवननेदेखील (R. Madhavan) लूक टेस्ट दिली होती. 


गेल्या काही महिन्यांपूर्वी अभिनेता आर माधनवचा शिवरायांच्या वेशभूषेतील एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोनं त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आर माधनवच्या या लुकचे नेटकऱ्यांकडून कौतुक झाले होते. या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. 


आर माधनवची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी लुकटेस्ट करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे त्याला ही भूमिका मिळाली नाही. यावर त्याने रडतानाचे इमोजी शेअर करत खंत व्यक्त केली होती. शिवरायांची भूमिका साकारायला न मिळाल्याचे त्याला प्रचंड दु:ख झाले होते. 






खिलाडीकुमारचं मराठी सिने-सृष्टीत पदार्पण


‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमातील अक्षयच्या निवडीवर सध्या सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'हर हर महादेव' आणि 'शिवप्रताप गरुडझेप' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला होते. यात 'हर हर महादेव' सिनेमात सुबोध भावे छत्रपती शिवाजी महजाराजांच्या भूमिकेत होता. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’ या सिनेमात शिवरायांची भूमिका साकारली होती. 


तगडी स्टारकास्ट असलेला ‘वेडात मराठे वीर दौडले सात’!


‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात प्रतापरावांच्या भूमिकेत प्रवीण तरडे दिसणार आहे. तसेच हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ.उत्कर्ष शिंदे, नवाब शहा तसेच दिपाली सय्यद, शिवानी सुर्वे, गौरी इंगवले, हेमल इंगळे  हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


Vedat Marathe Veer Daudle Saat: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कशी मिळाली? अक्षय कुमार म्हणाला...