Pushpa - The Rise : "पुष्पा - द राइज" सिनेमातील पहिले गाणे 'जागो जागो बकरे' प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर अल्पावधीतच या गाण्याने सगळे रेकॉर्ड ब्रेक केलं होता. आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'श्रीवल्ली' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'श्रीवल्ली' गाणे 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. जावेद अली यांनी हिंदीत तर सिड श्रीराम यांनी तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये गायलेले आणि देवी प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेले हे मधूर गाणे असणार आहे. 


'रश्मिका' पात्रावर आधारित गाणे
'श्रीवल्ली' गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात रश्मिका कोणती भूमिका साकारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटातील हे दुसरे गाणे 'रश्मिका'च्या पात्रावर प्रकाश टाकण्याचे काम करत आहे. चित्रपटातील या गाण्याचे अनेक प्रेमळ पदर आहेत. तसेच या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे पाच भाषांत बनवलेले आहे. 2021 सालातील हे गाणे प्रचंड लोकप्रिय होणार आहे. 


इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांनी बनविलेले गाणे
रवी शंकर म्हणाले कि, "चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळणारे हे गाणे 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याने आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. रश्मिकाने 'पुष्पा' सिनेमात साकारलेली भूमिका ही 'पुष्पा' चित्रपटाची आणि 'श्रीवल्ली' गाण्याची खासियत असणार आहे. चित्रपटातील या दुसऱ्या गाण्यातून पात्रांचे संगीतमय वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे गाणे जावेद अली आणि सिड श्रीराम यांनी स्वरबद्ध केले आहे तर देवी प्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे. त्यामुळेच आम्हाला आशा आहे कि प्रेक्षकांनादेखील हे गाणे नक्की आवडेल. हे गाणे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांनी बनविलेले आहे. 


या दिवशी होणार 'पुष्पा' सिनेमा प्रदर्शित
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा 'पुष्पा' सिनेमा 17 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटाचा दुसरा भाग 2022 सालात प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


जाणून घ्या "हे"  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे.