एका फॅशन शोसाठी दिल्लीत आलेला रितेश सिधवानी म्हणाला की, 'मला कळत नाही अशा गोष्टी कशा काय चर्चेत येतात. मी फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो. मी माहिरासोबत 45 दिवस शूटींग केलं आहे आणि सिनेमा संपवला आहे. मला आशा आहे की, माझं हे बोलणं साऱ्या चर्चेबाबत संभ्रम दूर करेल.'
माहिराला रिप्लेस केल्याच्या बातमीवर रितेशनं स्पष्टीकरण का दिलं नाही? या प्रश्नावर सिधवानी म्हणाला की, 'मी अशा बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं नाही कारण की, अशा बातम्यांवर मी वक्तव्य केल्यास असं करण्याऱ्यांना आणखी चेव चढेल आणि त्यांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळेल.'
हा सिनेमा पुढील वर्षी जानेवारीमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
पाकिस्तानी कलाकारांना मनसेचं अल्टिमेटम
उरी हल्ल्यानंतर मनसेने याप्रकरणी ताठर भूमिका घेत, पाकिस्तानी कलाकारांना अल्टिमेटम देऊन बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याची मागणी केली होती. याशिवाय फवाद खानचा ‘ए दिल है मुश्किल’ आणि माहिरा खानचा ‘रईस’ हे चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, अशी धमकीही मनसेने दिली होती.
असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन वाद
शाहरुखच्या ‘दिलवाले’ या सिनेमाच्या प्रदर्शनावेळीही असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. याचा सर्वाधिक फटका चित्रपट निर्मात्याला बसला. विशेष म्हणजे, ‘रईस’ चित्रपटाच्या शूटिंगवेळीही गुजरातमध्ये शाहरुखला कडाडून विरोध झाला होता. त्यामुळे शाहरुख खान आणि सिनेमा निर्माता कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीत. यातूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतं.
पाक कलाकारांवरच्या बंदीवरुन बॉलिवूडमध्ये मतभेद
दरम्यान, ‘द इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर’ने भारत-पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण निवळेपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंदी घातली होती. यानंतर बॉलिवूडमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. सलमान खान, करण जोहर, हंसल मेहता आणि अनुराग कश्यप यांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणे चुकीचे असल्याचे म्हटले होतं. तर रणदीप हुड्डा, सोनाली बेंद्रे आणि नाना पाटेकर आदींनी पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीचे समर्थन केलं होतं.
संबंधित बातम्या: