श्रीदेवी यांचा तीन दिवसांपूर्वी दुबईत मृत्यू झाला. मृत्यूची चौकशी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कपूर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आणि पार्थिव रात्री 9.40 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झालं. यावेळी कपूर कुटुंबीय त्यांच्यासमवेत होतं. टीना आणि अनिल अंबानी, अनिल कपूर, सोनम कपूर विमानतळावर उपस्थित होते.
अंधेरीच्या सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पार्ल्याच्या स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून लाखो चाहते मुंबईत दाखल झाले आहेत.