प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी 1200 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपपत्रात आत्महत्येच्या काही दिवस आधी राहुल आणि प्रत्युषा यांच्या फोन संभाषणाचा उल्लेख आहे. प्रेग्नंट असल्याने प्रत्युषा रागात आहे आणि तिसऱ्याच व्यक्तीकडून जीवाला धोका असल्याचा उल्लेख करत असल्याचं या संभाषणावरुन कळतं.
'बालिका वधू' या मालिकेत आनंदीची भूमिका साकारलेल्या 24 वर्षीय प्रत्युषाने 1 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने गर्भपात केला होता : डॉक्टर
राहुल आणि प्रत्युषाचं फोनवरील संभाषणा
तारीख :- 27.03.2016 वेळ :- दुपारी 3.43
राहुल :- काय झालं बघ?
प्रत्युषा :- सगळं संपलं आहे
राहुल :- काम वगैरे
प्रत्युषा :- मी मेल्यानंतर सगळं सुरु राहिल, तू काय करणार
राहुल :- एका छोट्याशा कारणासाठी
प्रत्युषा :- कारण लहान नाही, खूप मोठं आहे.
राहुल :- काय आहे
प्रत्युषा :- कारण आहे की, मी चारित्र्यहीन नसूनही मला चारित्र्यहीन म्हटलं जातं. त्यावरुन मला धमकी दिली जात आहे. माझ्या आई-वडिलांना मारुन टाकतील, सगळ्यांना मारलं जाईल. त्यामुळे जे नाही ते मला बोलावं लागतं.
राहुल :- तू स्पष्टीकरण देऊ नको. आता जे काही ते स्पष्ट झालं आहे.
प्रत्युषा :- मी करत नाही, मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही, बॉस
राहुल :- प्रत्युषा ..... प्रत्युषा
प्रत्युषा :- राहुल राज सिंह इगो तुझ्याजवळच ठेव, कारण पुढच्या काही तासातच....कदाचित मिनिटांत इगो दाखवण्यासाठी काहीही शिल्लक नसेल.
या संभाषणावरुन स्पष्ट होतं की, प्रत्युषा स्वत:च्या आणि आई-वडिलांच्या जीवाला कोणाकडून तरी धोका असल्याचा उल्लेख करत आहे. पण असा प्रश्न उपस्थित होतो की, अखेर ही तिसरी व्यक्ती कोण आहे?
प्रत्युषा बॅनर्जी आणि राहुल राज सिंह यांच्या पुढील फोन संभाषणात प्रत्युषा बाळाला जन्म न देण्याबाबत आणि परिणाम भोगण्याबाबत बोलत आहे.
'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या
राहुल आणि प्रत्युषाच्या फोन संभाषणाचा पुढील भाग
प्रत्युषा :- माझं ऐक....माझं ऐक.... बाब अतिशय गंभीर आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आहे.
राहुल :- आणि माझं पण खूप प्रेम आहे
प्रत्युषा :- आता प्रॉब्लेम आहे की....हो.... त्याचाच परिणाम भोगत आहे
राहुल :- हो
प्रत्युषा :- ठीक आहे आणि तू भोग, तू सुखात राहा आणि सगळ्यांना सुखात ठेव
राहुल :- अर्ध्या तासात येऊन तुझ्याशी बोलतो
प्रत्युषा :- आता तर बाळाचा जन्मच होणार नाही
राहुल :- हे बघ, येऊन बोलतो
प्रत्युषा :- अर्धा तास!.... दहा मिनिटांनतर मी जिवंत राहणार नाही Its Over
राहुल आणि प्रत्युषा यांच्यातील फोनवरील संभाषण केवळ प्रेम, वाद, रुसवा-फुगवा यापर्यंत मर्यादित नाही. प्रत्युषा फोनवर स्वत:ला विकण्यासंदर्भात आणि या परिस्थितीसाठी राहुल जबाबदार असल्याचा उल्लेख करत आहे.
राहुल आणि प्रत्युषाचं फोनवरील संभाषण
राहुल :- तू असं का करतेयस, यार
प्रत्युषा :- तुझ्यासोबत?....... ....... ..... तुम्ही स्वार्थी आहात. माझं नाव खराब होत आहे.... माझ्याबाबत बोललं जात आहे.....तुला जेवढं टेंशन नाही, त्यापेक्षा खूप जास्त टेंशन मला आहे.
राहुल :- तू असं करणार का माझ्यासोबत?
प्रत्युषा :- (शिवी)... इथे मी स्वत:ला विकायला नाही तर अॅक्टिंग करायला आले. काम करायला आले तर काम करणार. हे माझे शब्द आहेत आणि तू मला कशात ढकलतोयस, राहुल. मला किती वाईट वाटतंय याची तुला जराही कल्पना नाही.
प्रत्युषा :- तुझ्यासाठी......तू माझ्याशी कमिटेड आहेस.....कुठेतरी तुझं नाव माझ्याशी जोडलेलं आहे.
राहुल :- पण तू काहीच पाऊल उचलत नाही.
प्रत्युषा :- मला वेश्या.......
राहुल :- तर विचार कर
प्रत्युषा आत्महत्या : बॉयफ्रेण्ड राहुल राजविरोधात गुन्हा दाखल
प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येला 7 महिने झाले आहेत आणि तिचे आई-वडील आजही मुलीला न्याय मिळावा यासाठी भटकत आहेत. "माझ्या मुलीला तिसऱ्याच व्यक्तीकडून धमकी मिळत होती, याचा तपास करायला हवा होता," असं प्रत्युषाच्या आईचं मत आहे. तसंच "राहुल राजने प्रत्युषाला नशेचं व्यसन लावलं आणि तिच्याकडून चुकीचं काम करुन घेतलं," असा आरोपही तिच्या आईने केला आहे.
चार्जशीटमध्ये उल्लेख केलेल्या राहुल राज सिंह आणि प्रत्युषा बॅनर्जी यांच्यातील फोन संभाषणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची दिशाभूल करणारा राहुल राज सिंह अखेर काय लपवत आहे? धमकी देणारी तिसरी व्यक्ती कोण, ज्याचा उल्लेख प्रत्युषा करत आहे? अखेर मुंबई पोलिस तिसऱ्या व्यक्तीच्या शोधाच्या दिशेने तपास का करत नाहीत?.
पाहा व्हिडीओ