Pratishodh Zunj Astitvachi : गेल्या काही दिवसांत आशयघन विषय असलेल्या वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' (Pratishodh Zunj Astitvachi) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे. निरनिराळ्या मालिका आणि सिनेमांमधून वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर (Amol Bavdekar) आता अजून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
'प्रतिशोध' या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल बावडेकर यांचा हा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. पण मालिकेत भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांच्या भविष्यात काय अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.
'प्रतिशोध' या थरारक मालिकेचा मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर येते आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने रंगेल यात काही शंका नाही. ही मालिका 16 जानेवारी 2023 पासून सोम. ते शनि. रात्री 10 वा. सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या