Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) जिवंत असल्याचं समोर आलं आहे. अशातच आता अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंबंधित (Cervical cancer) वेबसाईट सुरू केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.


पूनम पांडेची वेबसाईट काय आहे? (Poonam Pandey Website)


पूनम पांडेची 'poonampandeyisalive.com' अशी वेबसाईट आहे. हॉटरफ्लाय ही एक सौंदर्य, फॅशन संदर्भातील वेबसाईट आहे. या वेबसाईटसोबत पूनमने करार केला आहे. पूनमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपण हॉटरफ्लायसोबत भागीदारी केल्याचं सांगितलं आहे. 






पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हे पब्लिसिटी स्टंट असल्याची दाट शक्यता वर्तवली गेली होती. पण तिने तिच्या नव्या वेबसाईटच्या प्रमोशनसाठी मरणाचं नाटक केलं होतं. आता वेबसाईट लाँच करत अभिनेत्रीने चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.


पूनमची पोस्ट व्हायरल (Poonam Pandey Post)


पूनमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं शेअर करायचं आहे आणि ते म्हणजे - मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग (Cervical Cancer) झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि त्यावर HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण केली पाहिजे. या रोगाबद्दल जागरुकता पसरवून एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला यावरील उपायांबद्दल माहिती मिळेल, याची खात्री करुया. चला एकत्रितपणे रोगाच्या विनाशकारी परिणामांचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया आणि #DeathToCervicalCancer चा अवलंब करुया".






संबंधित बातम्या


Poonam Pandey : "पूनम पांडे जिवंत"; निधनाच्या अफवांना पूर्णविराम देत शेअर केला व्हिडीओ