Complaint Against Prakash Raj: कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांनी एक ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटमुळे आता प्रकाश राज हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 


ANI च्या माहितीनुसार, चांद्रयान-3 मिशनबाबत ट्वीट केल्याबद्दल अभिनेता प्रकाश राज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी त्याच्याविरोधात बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि कारवाईची मागणी केली. 






प्रकाश राज यांचे ट्वीट


प्रकाश राज यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर शर्ट आणि लुंगी घातलेल्या चहा विक्रेत्याची कार्टून इमेज शेअर केली. या इमेजला त्यांनी कॅप्शन दिलं, 'ब्रेकिंग न्यूज,
चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो... व्वा...  justasking...' 






प्रकाश राज यांनी आणखी एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेषच दिसतो. मी आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोदाचा संदर्भ देत होतो. आमच्या केरळ चायवालाबद्दल बोलत होतो. कोणता चायवाला ट्रोलर्सनी पाहिला? जर तुम्हाला विनोद कळत नसेल तर हा जोक तुमच्यासाठीच आहे. GROW UP'


प्रकाश राज यांनी वारिसू, केजीएफ, वॉन्टेड या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सिंघम या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी  जयकांत शिक्रे ही भूमिका साकारली होती. बॉलिवूड बरोबरच साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Prakash Raj: 'चंद्राचे पहिले छायाचित्र'; प्रकाश राज यांनी शेअर केलेलं ट्वीट पाहून भडकले नेटकरी, अभिनेते स्पष्टीकरण देत म्हणाले, 'मी आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोद...'