Pawan Kalyan : चाहत्याची मिठी दाक्षिणात्य सुपरस्टार आणि जनसेना पक्षाचे सर्वेसर्वा पवन कल्याण (Pawan Kalyan) यांना चांगलीच महागात पडली असती. टॉलिवूड स्टार पवन कल्याण अपघातातून थोडक्यात बचावला आहे. 


राजकीय रॅलीमध्ये धावत्या कारच्या टपावर उभे राहिल्याने टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण चाहत्याच्या अतिउत्साहामुळे खाली पडणार होते. मात्र त्यांनी वेळीच स्वतःला सावरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि स्वतःच्याच कारखाली येण्यापासून ते वाचले. हा प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे.





आंध्र प्रदेशात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. अतिउत्साही चाहता पवन कल्याण यांच्या कारवर चढला. या व्हिडीओमध्ये पवनचा चाहता त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याचा तोल गेल्याने दोघेही खाली पडले. पवन कल्याण गाडीवरच पडल्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली नाही. पवन कल्याणचा हा चाहता नक्की कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, समंथाच्या लूकने लावले चारचॉंद


Thar : नेटफ्लिक्सवर बाप-लेक आमने-सामने, 'थार'मध्ये अनिल कपूरसोबत दिसणार हर्षवर्धन कपूर