Parineeti Chopra and Raghav Chadha : आदमी पार्टीचे खासदार   राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  परिणीती चोप्रा  (Parineeti Chopra) यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. बुधवारी (22 मार्च) हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. परिणीती आणि राघव हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे. आता नुकताच एका फोटोग्राफरनं परिणीतीला राघव चड्ढा यांच्याबाबत एक प्रश्न विचारला. राघव चढ्ढा यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर परिणीतीनं खास रिअॅक्शन दिली आहे. 


परिणीतीच्या रिअॅक्शननं वेधलं लक्ष 


परिणीतीला 28 मार्च रोजी एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी फोटोग्राफर्सनं परिणीतीचे फोटो काढले. एका फोटोग्राफरनं राघव आणि परिणीती यांच्या नात्याबद्दल सुरु असलेल्या चर्चेबाबत परिणीतीला प्रश्न विचारला. या प्रश्नाला परिणीती उत्तर दिलं नाही. पण तिनं स्माइल दिली. परिणीतीच्या या रिअॅक्शनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी परिणीती ब्लॅक कोट, ब्लॅक पँट आणि चष्मा अशा फॉर्म लूकमध्ये दिसत होती. 


पाहा व्हिडीओ:






राघव चढ्ढा यांची प्रतिक्रिया


डेटिंगच्या चर्चेबाबत काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना विचारण्यात आलं. त्यावेळी आपचे नेते राघव चढ्ढा यांनी एबीपी न्युजला सांगितलं, 'मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबाबत नाही.' पुढे राघव यांना प्रश्न विचारण्यात आला की, जे लोक तुमच्या रिलेशनशिपबाबत विचारत आहेत, त्यांना काय सांगाल?' यावर ते म्हणाले, 'त्यांनाही लवकरच उत्तर मिळेल.' राघव यांच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 


'आप' च्या खासदारानं ट्वीट शेअर करुन दिल्या शुभेच्छा


आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार  संजीव अरोरा यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा.' या ट्वीटमध्ये संजीव अरोरा यांनी परिणीती आणि राघव यांचा फोटो देखील शेअर केला आहे. संजीव अरोरा यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. संजीव अरोरा यांचे ट्वीट पाहिल्यानंतर आता परिणीती आणि राघव हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रासोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सोडले मौन; म्हणले, 'मला...'