(Source: Poll of Polls)
राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही होते लॉबिंग? परेश रावल याचं बेधडक वक्तव्य चर्चेत, स्पष्टच म्हणाले, “ लॉबिंग तर..”
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांपासून ते ऑस्करपर्यंत होणाऱ्या लॉबिंगबद्दल उघडपणे चर्चा केली.

Paresh Raval: बॉलिवूडमधील अनुभवी आणि बेधडक बोलणारे अभिनेता परेश रावल पुन्हा एकदा त्यांच्या थेट स्वभावामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट चित्रपट पुरस्कारांवर भाष्य करत मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांपासून ते ऑस्करपर्यंत होणाऱ्या लॉबिंगबद्दल उघडपणे चर्चा केली. तसेच, त्यांच्या दृष्टीने खरी ओळख म्हणजे ट्रॉफी किंवा टायटल्स नव्हे, तर क्रिएटिव्ह समाधान असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. (Bollywood)
काय म्हणाले परेश रावल?
“अवॉर्ड म्हणजे काय हे मला फारसं माहीत नाही. नेशनल अवॉर्डमध्ये थोडंफार लॉबिंग होतं, पण बाकी अवॉर्ड्समध्ये जसं होतं तसं नाही. ते इतर पुरस्कारांइतके नाही. तुम्ही इतर पुरस्कारांबद्दल बोला किंवा नाही बोला हे महत्त्वाचे नाही. राष्ट्रीय पुरस्कार हा एक राष्ट्रीय पुरस्कार आहे, तो प्रतिष्ठित आहे.
ऑस्करमध्येही होते लॉबिंग
रावल यांनी स्पष्ट केलं की, लॉबिंग ही फक्त भारतातील अवॉर्ड्सपुरती मर्यादित नाही. “लॉबिंग तर ऑस्कर अवॉर्ड्समध्येही असते. ही पूर्ण प्रक्रिया इन्फ्लुएन्स आणि नेटवर्किंगवर चालते. म्हणतात की ‘राजची पिक्चर आहे’, मग अकादमीचे सदस्य व्हिप अप केले जातात. ही गोष्ट सर्वत्र आहे,” असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, काही मोठ्या निर्मितीसंस्था किंवा प्रभावशाली व्यक्ती अकादमी मेंबर्सवर प्रभाव टाकून अवॉर्ड्सचा निकाल ठरवतात.
“माझं खरं अवॉर्ड म्हणजे दिग्दर्शक आणि लेखकाचं कौतुक”
अवॉर्डपेक्षा आपल्या क्रिएटिव्ह टीमकडून मिळणाऱ्या प्रशंसेलाच ते महत्त्व देतात, असं परेश रावल म्हणाले. “अवॉर्ड म्हणजे इंडस्ट्रीकडून मिळालेली मान्यता असते. पण माझ्यासाठी ती फ्रेटरनिटी म्हणजे दिग्दर्शक आणि लेखक. जेव्हा डायरेक्टर ‘कट’ म्हणतो, किंवा लेखक म्हणतो की ‘तू काम अप्रतिम केलंस’, तेव्हाच माझं अवॉर्ड मिळालं असं मी समजतो.” “माझ्या डायरेक्टरला आणि लेखकाला जेव्हा वाटतं की मी चांगलं काम केलंय, तेव्हाच मला समाधान मिळतं. त्याशिवाय काही निवडक लोक आहेत ज्यांच्या मतांचा मी सन्मान करतो. ते म्हणाले की ‘अरे, काय कमाल केलंस’, तर मग सोनेपे सुहागा!”



















