Pankaj Tripathi :  मागील काही वर्षांपासून पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. आपल्या सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये साईड रोल्स साकारणारे पंकज त्रिपाठी यांनी काही वेळेस चित्रपटातील मुख्य अभिनेत्यापेक्षाही दमदार भूमिका केली आहे. 

Continues below advertisement


पंकज त्रिपाठी यांची बॉलीवूड चित्रपटांपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत प्रत्येक गोष्टीवर जादू चालवली आहे. सध्या 'मिर्झापूर 3'मध्ये दिसणारे पंकज त्रिपाठी यांनी बॉलिवूडमधील बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. अनेक आव्हानात्मक भूमिका साकारणारे  पंकज त्रिपाठी हे एकदा हाणामारीच्या सीनदरम्यान बेशुद्ध पडले होते. 


'अग्निपथ'शी निगडीत आहे किस्सा...


पंकज त्रिपाठी यांनी आपल्या एका मुलाखती दरम्यान हा किस्सा सांगितला होता. वर्ष 2012 मध्ये रिलीज झालेल्या अग्निपथ चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनीदेखील भूमिका साकारली होती. पंकज त्रिपाठी यांची  खलनायकाच्या गटातील गुंडाची भूमिका होती. चित्रपटातील एका सीनमध्ये हृतिक रोशन हा पंकज त्रिपाठी यांना चाकू भोसकतो  असे दृष्य होते. 






बेशुद्ध झाले होते पंकज त्रिपाठी... 


 पंकज त्रिपाठी यांनी एकदा 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत  'अग्निपथ'शी संबंधित हा किस्सा शेअर केला होता. पंकज त्रिपाठी यांनी  सांगितले की,, 'त्या सीनमध्ये हृतिकने माझ्यावर 3-4 वेळा वार केले होते. मला मरण्याचा अभिनय करावा लागत होता. माझा मृत्यू झालाय हे दाखवण्यासाठी मी माझा श्वास रोखून धरला. वार केल्यासारखे काय वाटते ते मला माहित नव्हते.


त्यांनी पुढे सांगितले की, 'जर तुम्ही तो सीन  काळजीपूर्वक पाहिला, तर तुम्हाला लक्षात येईल की माझे डोळे पूर्णपणे लाल झाले आहेत. एखादी व्यक्ती फक्त कल्पना करू शकते. मला आठवते की दुसऱ्या किंवा तिसऱ्या टेकमध्ये मी काही सेकंदांसाठी बेशुद्ध  झालो होतो. मी पडलो होतो. कॅमेरा सर्वकाही टिपत असताना, मला ब्लॅकआउट झाला आणि मी बराच वेळ श्वास रोखून धरल्यामुळे मी कोसळलो. लोक लगेच माझ्याभोवती जमा झाले आणि माझ्या चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा करू लागले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला दिसले की माझ्या आजूबाजूला खूप लोक उभे आहेत.


'कालीन भैय्या'मुळे विशेष ओळख


 पंकज त्रिपाठी अनेक हिंदी चित्रपटात छोट्या, सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या आहेत.  त्यातील काही भूमिकांसाठी लोकांनी त्यांचे कौतुक केले. 'मिर्झापूर' या वेब सीरिजमधील कालीन भैय्या या व्यक्तीरेखेना त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली.