Kapil Sharma Tweet on Umer Sharif: पाकिस्तानचे प्रसिद्ध कॉमेडियन ओमर शरीफ (Umer Sharif) यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. ही बातमी समोर आल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आहे. आता कपिल शर्मानेही (Kapil Sharma) ट्विट करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ज्यात त्याने लिहिले, की 'अलविदा लिजेंड. तुमच्या आत्म्याला शांती लाभो.' ओमर शरीफ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
ओमर शरीफ खूप दिवसांपासून आजारी होते. 2020 मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रियेनंतर, त्यांना स्मृतिभ्रंश झाला होता आणि त्यांची तब्येतही सतत खालावत होती. त्यामुळे त्यांना अमेरिकेत नेण्यासाठी 28 सप्टेंबर रोजी एअर अॅम्ब्युलन्सने उड्डाण केले, पण वाटेत त्याची तब्येत बिघडली, ज्यामुळे ओमर शरीफ यांच्या विमानाला जर्मनीत उतरावे लागले आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ऑगस्टमध्ये हृदयविकाराचा झटका
असेही म्हटले जात आहे की त्यांना ऑगस्ट महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. यातून ते सहीसलामत वाचले. याशिवाय त्याच्या दोन बायपास शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. यामुळे त्यांची प्रकृती सतत खालावत आहे. पाकिस्तानबरोबरच ओमर शरीफ यांना जगातील एक महान विनोदकार, अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखले गेले. त्यांनी विनोदाची पातळी एका उंचीवर नेऊन ठेवली. याच कारणामुळे त्यांना जगभर प्रेम आणि आदर मिळाला. आज, त्याच्या जाण्यानंतर, जगभरातील विनोदी कलाकार त्यांना पाणावलेल्या डोळ्यांनी आठवत आहेत.
पाकिस्तानचे क्रिकेटपटू बाबर आझम यांनी ट्विट केले की, "ओमर शरीफ साहब यांच्या निधनामुळे मी अत्यंत दु: खी आहे. तो खरोखरच विनोदी राजा होता आणि पाकिस्तानचा लिजेंड होता. अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौस देवो, अमीन. कृपया त्यांच्या आत्म्यासाठी सूरा फातिहा वाचा. "