OTT Release This Week : मनोरंजनसृष्टीसाठी हे वर्ष खूपच खास आहे. या वर्षात अनेक चांगले सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत आहेत. सिनेमागृहानंतर आता ओटीटीवर या कलाकृती रिलीज होत आहेत. ओटीटीप्रेमींसाठी हा आठवडा खूपच खास आहे. या आठवड्यात अनेक धमाकेदार वेबसीरिज-सिनेमे प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहेत. यात मर्डर, सस्पेंस आणि विनोदी अशा वेगवेगळ्या जॉनरचा समावेश आहे. 11 ते 17 मार्च दरम्यान नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, झी 5, डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. पंकज त्रिपाठीच्या (Pankaj Tripathi) 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) या सिनेमापासून ते तेजा सज्जाच्या (Teja Sajja) 'हनुमान'पर्यंत (Hanuman) अनेक कलाकृती या आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत.
मैं अटल हूँ (Main Atal Hoon)
कधी रिलीज होणार? 14 मार्च 2024
कुठे पाहाल? झी 5
पंकज त्रिपाठीचा (Pankaj Tripathi) 'मैं अटल हूँ' हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला. आता सिनेमागृहात धमाका केल्यानंतर दोन महिन्यांनी हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. 14 मार्चला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. पंकज त्रिपाठीसह या सिनेमात पियुष मिश्रा, रमेश कुमार सेवक, दया शंकर पांडे, प्रमोद पाठक, पायल नायर, राजेश खत्री, एकलाख खान आणि हर्षद कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हनुमान (Hanuman)
कधी रिलीज होणार? 16 मार्च
कुठे पाहता येईल? झी 5
तेजा सज्जा (Teja Sajja) स्टारर 'हनुमान' (Hanuman) हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आधी हा सिनेमा 8 मार्च रोजी झी 5 या ओटीटीवर रिलीज होणार होता. पण आता हा सिनेमा 16 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
भ्रमयुगम (Bramayugam)
कधी रिलीज होणार? 15 मार्च
कुठे पाहता येईल? सोनी लिव्ह
'भ्रमयुगम' हा सिनेमा 15 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता. आता एक महिन्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. 15 मार्च 2024 रोजी हिंदीसह पाच भाषांमध्ये हा सिनेमा सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
शो टाइम (Show Time)
कधी रिलीज होणार? 8 मार्च
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार
इमरान हाशमी, नसीरुद्दीन शाह आणि मौनी रॉय स्टारर 'शो टाइम' 8 मार्चपासून डिज्नी हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येईल.
मर्डर मुबारक (Murder Mubarak)
कधी रिलीज होणार? 15 मार्च
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्सची 'मर्डर मुबारक' ही सीरिज दिल्ली क्लबमधील एका घटनेवर आधारित आहे. होमी अदजानियाने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पंकज त्रिपाठीसह या सीरिजमध्ये सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर आणि संजय कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
बिग गर्ल्स डोंट क्राई (Big Girls Don't Cry)
कधी रिलीज होणार? 14 मार्च 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ
पूजा भट्ट अभिनीत 'बिग गर्ल्स डोंट क्राई' ही सीरिज प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहता येईल. नित्या मेहरा, सुधांश सरिया, करण कपाडिया आणि कोपल नैथानी यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. पूजा भट्टसह या सीरिजमध्ये राइमा सेन, अवंतिका वंदनपु, जोया हुसैन आणि मुकुल चड्डा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या