OTT Release This Week: सप्टेंबर महिन्यामध्ये विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movie) ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार आहेत. तुम्ही या वेब सीरिज नेटफ्लिक्स (Netflix) तसेच प्राइम व्हिडीओ या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. सप्टेंबर महिन्यामध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.
फ्रायडे नाइट प्लान (Friday Night Plan)
फ्रायडे नाइट प्लान हा चित्रपट 1 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. वत्सल नीलकांतन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात जुही चावला, बाबिल खान यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट घरबसल्या पाहू शकता.
हड्डी (Haddi)
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हड्डी या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटामध्ये इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा और सहर्ष शुक्ला या कलाकारांनी देखील काम केलं आहे.
द फ्रीलांसर (The Freelancer)
द फ्रीलांसर ही वेब सीरिज 1 सप्टेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजमध्ये मोहित रैना, अनुपम खेर, कश्मिरा परदेशी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
द व्हील ऑफ द टाइम सीजन 2 (The Wheel of Time Season 2)
द व्हील ऑफ द टाइम या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आता या सीरिजचा दुसरा सीझन रिलीज होणार आहे. द व्हील ऑफ द टाइम सीजन 2 1 सप्टेंबरला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.