OMG 2 New Promo: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट ओएमजी- 2 (OMG 2) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. ओएमजी- 2 या चित्रपटाची सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. ओएमजी- 2 (OMG 2) मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर OMG 2 चित्रपटामधील सीनचा व्हिडीओ शेअर केली आहे.या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर रागाने बोलताना दिसत आहे. कारण त्याचे काही सामान हरवले आहे.


व्हिडीओमध्ये दिसत आहे की अक्षय म्हणतो,  'आग लगा दूंगा पूरे शहर को, अगर मेरा सामान नहीं मिला... तुम सब मेरा गुस्सा नहीं जानते, पिछली बार जब गर्म हुआ था तो 13 दिन लगे थे, 13 दिन लगे थे ठंडा होने के लिए.'


ओएमजी- 2  चित्रपटाचा हा व्हिडीओ शेअर करुन पंकज यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "कहाँ मिलेगा इनका सामान?" 






'OMG 2' हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी व्यतिरिक्त यामी गौतम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी कांती शरण मुद्गल यांची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 


काही दिवसांपूर्वी 'OMG 2' या चित्रपटाचा ट्रेलर  अक्षय कुमारनं  सोशल मीडियावर शेअर केला होता. अक्षय कुमारनं शेअर केलेल्या ओएमजी- 2 या चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. ओएमजी- 2 या चित्रपटाला सेन्सॉरने 'ए' प्रमाणपत्र दिले आहे. आज (11 ऑगस्ट) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ओएमजी-2  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ओह माय गॉड 2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


OMG 2 Trailer: 'शुरु करो स्वागत की तैयारी...' ; अक्षयच्या ‘ओमएजी 2’ चा ट्रेलर रिलीज