Netflix OTT Release : भारतातील ओटीटी बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी नेटफ्लिक्सने (Netflix) कंबर कसली आहे. जगभरात नेटफ्लिक्स हे लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) आहे. नेटफ्लिक्सने भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. खास भारतीय प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने चित्रपट आणि वेब सीरिज लाँच केले होते. आता, 2024 मध्ये नेटफ्लिक्सने भारतीय प्रेक्षकांना लक्षात घेता वेब सीरिज (New Web Series On Netflix) आणि चित्रपटांची (New Movies On Netflix) घोषणा केली आहे.
नेटफ्लिक्सने गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी OTT दर्शकांसाठी एक खास भेट दिली आहे. तुमच्या फोनचा डेटा संपू शकेल, Netflix च्या सीरिज, चित्रपट संपणार नाहीत. नेटफ्लिक्सने 8-10 नव्हे तर 19 प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यापैकी काही चित्रपट, वेब सीरिज रिलीजच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
'नेटफ्लिक्स'च्या आगामी वेब सीरिज
नेटफ्लिक्सने आपल्या सुपरहिट वेब सीरिजचे पुढचा सीझनही जाहीर केला आहे. यामध्ये 'खाकी: द बंगाल चॅप्टर', 'कोटा फॅक्टरी सीझन 3', 'काली काली आंखे सीझन 2' आणि 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' यांचा समावेश आहे. Netflix वेब सीरीजच्या या यादीमध्ये डब्बा कार्टेल (Dabba Cartel), मामला लीगल है (Mamla Legal Hai), मिसमॅच (Mismatched), आयसी814 (IC814) आणि मांडला मर्डर्स (Mandala Murders) यांचा समावेश आहे.
नेटफ्लिक्सवर कोणते चित्रपट झळकणार?
नेटफ्लिक्सने एक टीझर आणि एक पोस्टर शेअर करून आपल्या 19 चित्रपटांची, वेब सीरिजची घोषणा केली आहे. नीरज पांडेचा चित्रपट 'सिकंदर का मुकद्दर', तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसीचा 'फिर आयी हसीन दिलरुबा', काजोल आणि कृती सेनॉनचा 'दो पत्ती', अनुपम खेरचा 'विजय 69', जुनैद खान आणि दिलजीत दोसांझचा 'महाराज' आदी चित्रपटांची घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे. त्याशिवाय, वाइल्ड वाइल्ड पंजाब ही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर नेटफ्लिक्सवर झळकणार
कपिल शर्मा आपला शो 'द ग्रेड इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर आणणार आहे. या शोमध्ये सुनील ग्रोव्हर कॉमेडियन म्हणून कमबॅक करत आहे. बऱ्याच काळानंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.