VIDEO: 'बाळासाहेब ठाकरे मला प्रेरणा देतील', नवाजुद्दीनचं मराठीत भाषण
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2017 10:12 PM (IST)
'यावेळी सगळ्यांना प्रश्न पडला असेल की, हा मराठी कसं काय बोलेल? मी त्यांना खात्रीनं सांगतो बाळासाहेब ठाकरे मला प्रेरणा देतील, आशीर्वाद देतील आणि त्यांची लाडकी भाषा मराठी माझ्यावर तेवढंच प्रेम करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र!'
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचा टीझर आज (गुरुवार) लाँच करण्यात आला. हा टीझर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत लाँच केला गेला. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीन एका दुसऱ्या सिनेमाच्या शुटींगसाठी भारताबाहेर असल्यानं तो या टीझर लाँचिंगला उपस्थित राहू शकला नाही. पण यावेळी त्याच्या एका छोटेखानी भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. यावेळी तो थेट मराठीतच बोलला. बाळासाहेब ठाकरेंच्या बायोपिकसाठी नवाजुद्दीनच्या आधी या व्यक्तीरेखेसाठी अक्षय कुमार आणि इरफान खान यांच्या नावाचीही चर्चा होती. पण अखेर नवाजुद्दीनच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आलं. नवाजुद्दीन सिद्दीकी नेमकं काय म्हणाला? VIDEO : संबंधित बातम्या : 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, रिलीजचा मुहूर्तही ठरला!