एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाहिद कपूरच्या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तरुणाचा मृत्यू
'कबीर सिंह' हा चित्रपट तेलुगूतील सुपरहिट सिनेमा 'अर्जुन रेड्डी'चा रिेमेक आहे. यामध्ये शाहिदसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी 'कबीर सिंह' या चित्रपटाचं चित्रीकरण मसुरीतील एका हॉटेलमध्ये होत आहे. पण शूटिंगदरम्यान एका जनरेटर ऑपरेटरचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
'कबीर सिंह' हा चित्रपट तेलुगूतील सुपरहिट सिनेमा 'अर्जुन रेड्डी'चा रिेमेक आहे. यामध्ये शाहिदसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.
मृत तरुण सिनेमाच्या सेटवर जनरेटर रिपेअरिंगचं काम करत होता. त्याचवेळी त्याचा मफलर जनरेटरच्या पंख्यात अडकला. यानंतर डोकंही पंख्याला आपटल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला देहरादडूनच्या रुग्णालयात दाखल केलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
राम कुमार असं मृताचं नाव असून तो 35 वर्षांचा होता. मुजफ्फरनगरच्या किनोनी गावाचा तो राहिवासी होता. मृताच्या कुटुंबीयांना घटनेबाबत कळवल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या दुर्घटनेनंतर चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. ही घटना घडली त्यावेळी शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी तिथे उपस्थित नव्हते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement