Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Wedding Update : मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटेने (Prathamesh Laghate) गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं जगजाहीर केलं आहे. 'आमचं ठरलंय' असं म्हणत त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. आमचं ठरलंयच्या घोषणेनंतर प्रथमेश आणि मुग्धाच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. आता एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. 


'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या शूटिंगदरम्यान मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना काय हाक मारत असे? 


'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या शूटिंगदरम्यान मुग्धा प्रथमेशला दादा अशी हाक मारत असे.याबदद्ल बोलताना प्रथमेश म्हणाला की, मला मुग्धा आणि कार्तिकी दादा अशी हाक मारत असे. तुलनेनं कार्तिकी लवकर प्रथमेश म्हणायला लागली आणि त्यानंतर मुग्धा म्हणायला लागली. तर मुग्धा म्हणाली की,"प्रथमेश आधी माझ्यासाठी दादा होता आणि आता फक्त प्रथमेश झाला आहे". तर प्रथमेश आणि 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या सेटवरील मंडळी मुग्धाला 'माऊ' अशी हाक मारत असे. 


प्रथमेश आणि मुग्धाचं घरी कळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? 


प्रथमेश आणि मुग्धा गेल्या चार-पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून त्यांच्या घरच्यांना याबद्दल कल्पना होती. पण दोघे कधी सांगत आहेत याची ते वाट पाहत होते. प्रथमेश आणि मुग्धाने घरी सांगितल्यानंतर कुटुंबियांना खूप आनंद झाला. 


मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना वेळ कसा देतात? 


मुग्धा आणि प्रथमेशला एकमेकांना भेटण्यासाठी खास वेळ काढावा लागतो. अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या जास्त भेटी होतात. याबद्दल बोलताना मुग्धा म्हणाली की,"वैयक्तिकपेक्षा कामानिमित्ताने आमच्या जास्त भेटी होतात". 


प्रपोज कोणी केलं? 


मुग्धा आणि प्रथमेशचं (Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate) नातं जगजाहीर झाल्यानंतर त्यांच्यात प्रपोज नक्की कोणी कोणाला केलं याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली होती. याबद्दल बोलताना मुग्धा म्हणाली की,"प्रथमेशने मला सर्वात आधी प्रपोज केलं आहे".


मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लहानपणापासून एकमेकांना ओळखत असले तरी गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. याबद्दल बोलताना मुग्धा म्हणाली की,"सारेगपम लिटिल चॅम्प्स'मुळे प्रथमेश आणि माझी ओळख झाली. या कार्यक्रमानंतरही आमची मैत्री कायम राहिली. आमचं म्युझिकल ट्युनिग आधी जुळलं आणि नंतर आमचे विचार जुळले". 


संबंधित बातम्या


Prathamesh Laghate : आवडीच्या जेवणाचा बेत, हटके उखाणा; थाटात पार पडलं प्रथमेश लघाटेचं पहिलं केळवण