मुंबई: भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावरील बयोपिक 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत, कमाईचे द्विशतक पूर्ण केलं आहे.


फोक्स स्टार स्टुडिओने दिलेल्या माहितीनुसार, 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'ने जगभरात आद्याप 204 कोटींची कमाई केली आहे. बायोपिकच्या इतिहासात हा आत्तापर्यंतचा कमाईचा सर्वात्तम विक्रम असल्याचे चित्रपट निर्मात्यांचा दावा आहे.

या सिनेमाने भारतात 175.7 कोटी रुपये, तर परदेशात 29 कोटींची कमाई केल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले.

फॉक्स स्टार स्टुडिओ आणि अरुण पांडें यांच्या इंस्पायर्ड इंटरटेनमेंटच्या बॅनर खाली बनलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे. या सिनेमात धोनीचा रांचीपासून ते देशाचा सर्वात यशस्वी कर्णधारापर्यंतचा जीवनप्रवास दाखवला आहे.