मुंबई : 2015 साली बाहुबली आणि 2017 साली बाहुबली 2 या दोन चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. दोन्ही चित्रपटांनी जगभरात दोनशे-तीनशे नव्हे तर हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला. काही दिवंसापूर्वी या चित्रपटांच्या प्रिक्वेलची घोषणा करण्यात आली. या प्रिक्वेल वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. हा प्रिक्वेलमध्ये शिवगामीदेवी हे पात्र केंद्रस्थानी असेल. विशेष म्हणजे शिवगामी देवीच्या भूमिकेत आपल्यालाला एक मराठमोळी अभिनेत्री दिसणार आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामी देवीची भूमिका साकारणार आहे.

बाहुबलीच्या वेबसीरीजमध्ये माहिश्मती साम्राज्य आणि साम्राज्याची राजमाता शिवगामी यांची कथा दाखवण्यात येणार आहे. ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ असे या सीरिजचे नाव आहे. या वेबसीरीजमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामीची भूमिका साकारणार आहे. अभिनेता राहुल बोस स्कंददासाची भूमिका निभावणार आहे. बाहुबली 1 आणि 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री राम्या कृष्णन हिने शिवगामीची भूमिका केली होती. वेब सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी, वकार शेख, जामील खान, सिद्धार्थ अरोरा आणि अनुप सोनी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.


आनंद निलकंठन यांच्या ‘द राइज ऑफ शिवगामी’ या कांदबरीवर आधारित ही सिरिज असणार आहे. शिवगामीचा सामान्य मुलगी ते सम्राज्ञी असा प्रवास या सीरीजमधून आपल्यासमोर येणार आहे. या सीरीजमध्ये एकूण 9 भाग असतील.