Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे.  रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी  'बाई पण भारी देवा'  या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 'बाई पण भारी देवा'  चित्रपटामधील या अभिनेत्रींच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. आता नुकतीच एका बॉलिवूड अभिनेत्रीनं एक खास पोस्ट शेअर करुन  'बाई पण भारी देवा'  या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या बॉलिवूड अभिनेत्रीच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


मृणाल ठाकूरची पोस्ट


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूरनं (Mrunal Thakur)   'बाई पण भारी देवा' हा चित्रपट हैदराबाद येथील थिएटरमध्ये पाहिला. मृणालनं इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करुन  'बाई पण भारी देवा'  या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. मृणालनं पोस्टमध्ये लिहिलं, 'बाईपण भारी देवा,खूप छान चित्रपट आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. काहीजण म्हणतात, की हल्ली चांगले चित्रपट कुठे बनतात? त्यांना मला सांगायचे आहे की, चांगले चित्रपट बनतात बॉस! गेल्या 5 आठवड्यांपासून या चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत. मी हा चित्रपट हैदराबादमध्ये पाहिला, तो देखील हाऊसफुल शो होता.मला खूप  अभिमान वाटतो. हा चित्रपट नक्की बघा!'






मुझसे कुछ कहती… ये खामोशियाँ ,कुमकुम भाग्य, हर युग में आयेगा एक अर्जुन  यांसारख्या मालिकांमध्ये मृणालनं काम केलं. तसेच तिच्या सुपर 30, सीता रामम,बाटला हाउस  या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.






'बाईपण भारी देवा'  हा चित्रपट 30 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षक आणि सेलिब्रिटी या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.  अभिनेता जमनादास मजेठिया यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. केदार शिंदे यांनी 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.


संबंधित बातम्या


पहिला सेलिब्रिटी क्रश कोणता? 'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्रींनी दिलेल्या उत्तरांनी वेधलं लक्ष