Milind Soman : अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) कधी मॉडेलिंगमुळे तर कधी फोटोशूटमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो एका जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. मिलिंदने खास पुरुषांसाठी असणाऱ्या भांडी घासायच्या साबणाची जाहिरात केली आहे. ही जाहिरात त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


मिलिंदने काम केलेल्या जाहिरातीत एक मुलगा आईला मदत करण्यासाठी भांडी घासल्याचे सांगत आहे. दरम्यान मिलिंद त्याला 'विम ब्लॅक' या नव्या डिश वॉशची माहिती देताना दिसत आहे. तसेच त्या मुलाला टोमनादेखील मारत आहे. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 






मिलिंदने ही जाहिरात सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे,"पुरुषांसाठी खास भांडी धुण्याचा साबण आला आहे 'विम ब्लॅक". पुरुषांनी महिलांना घरकामात मदत करावी या उद्देशाने या प्रोडक्टची निर्मिती करण्यात आली आहे. एकीकडे या प्रोडक्टचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे ही जाहिरात केल्याने मिलिंद सोमणला ट्रोल केलं जात आहे. 


मिलिंद सोमणने शेअर केलेल्या जाहिरातीवर नेटकऱ्यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. जाहिरातीची निवड चुकीची, भांडी घासण्यासाठी स्त्री-पुरुष भेदभाव का?, फक्त ब्लॅक नाव दिल्यामुळे हे प्रोडक्ट पुरुषांसाठी?, मिलिंद सोमण अशाच जाहिराती करणार, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मिलिंदला ट्रोल केलं आहे. तसेच या जाहिरातीत मिलिंदने लिंगभेद केल्याचा आरोप केला जात आहे. 


संबंधित बातम्या


Milind Soman Birthday : न्यूड फोटोशूट ते 25 वर्ष लहान गर्ल फ्रेंडशी लग्न; फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणचा आज 57वा वाढदिवस