Hruta Prateek Wedding : फुलपाखरू फेम हृता दुर्गुळे (Hruta Durgule) नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सध्या हृता 'मन उडू उडू झालं'  (Man Udu Udu Zal) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे. हृताला फुलपाखरू मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. हृता 18 मे 2022 रोजी प्रतीक शाहसोबत 
(Prateek Shah) लग्नबंधनात अडकली आहे. 


बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात


हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने  चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. हृताने साखरपुड्याच्या काही दिवस आधी प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत प्रतिक शाहला डेट करत असल्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.


प्रतीक हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. हृताची 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीक शाहने केलं आहे. हृताचा 'अनन्या' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर 'दादा एक गुड न्यूज आहे' या हृताच्या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहेत. सोशल मीडियावर हृताचा मोठा चाहतावर्ग आहे. 


हृता दुर्गुळेने मालिका सोडलेली नाही...


हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश असे म्हटले जाते. फुलपाखरू मालिकेने हृताला ओळख मिळवून दिली. सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान हृता दुर्गुळेने मालिकेतून निरोप घेतला आहे, असे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हृता दुर्गुळेने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, 'मन उडू उडू झालं' ही मालिका मी सोडलेली नाही. या केवळ अफवा आहेत. सध्या मी मालिकेचे शूटिंग करत आहे. कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका".


संबंधित बातम्या


Hruta Durgule : मन उडू उडू झालं... हृता दुर्गुळे 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात


Hruta Durgule : 'मन उडू उडू झालं' मालिकेतून दीपूने घेतला निरोप? हृता दुर्गुळेने एबीपी माझाला दिली माहिती