मुंबई :  सिनेसृष्टीतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी एकेकाळची दिग्गज अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta kulkarni) यांनी किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदावरुन आपला राजीनामा (Resignation) दिला आहे. महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी राजीनामा दिल्याने महामंडलेश्वर आखाड्यात आणि सिनेसृष्टीतही याची चर्चा रंगली आहे. गतवर्षी महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किन्नर आखाड्यातून ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पद देऊन श्री यमाई ममता नंदगिरी नाव देण्यात आलं होतं. एबीपी न्यूजला एक दिवसापूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी परखड भूमिका मांडली होती. भगवे वस्त्र परिधान करणे म्हणजे भाजप किंवा कुणाचा एजंट होणे नाही, लवकरच मी भगवे वस्त्र काढून टाकेल, असे ममता कुलकर्णी यांनी म्हटले होते. ममता कुलकर्णी यांनी पत्र लिहून आपल्या राजीनाम्याबाबत कळवलं आहे. 

Continues below advertisement

"मी ममता मुकुंद कुलकर्णी, पूर्णपणे शुद्धीत आणि खंबीर मानसिक स्थितीत असून मी 27 जानेवारी 2026 रोजी आपल्या 'किन्नर आखाडा' येथील 'महामंडलेश्वर' या पदाचा राजीनामा देत आहे. डॉ.आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही, त्यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते, मला त्यांच्याबद्दल प्रेम व आदरच आहे. मुद्दा फक्त इतकाच आहे की, माझे आध्यात्मिक ज्ञान आता जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांप्रमाणे प्रवाही असेल, सत्याला कोणत्याही वस्त्राची किंवा प्रतिमेची (मूर्तीची) आवश्यकता नसते. माझे गुरू श्री चैतन्य गगनगिरी नाथ यांनी कधीही कोणतेही पद स्वीकारले नाही, मी 25 वर्षे आध्यात्मिक जीवन जगले आहे. अंतर्मुख होऊन माझा सराव जसा पूर्वी सुरू होता, तसाच तो आताही सुरू राहील. जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा मी कोणत्याही पक्षाशी, विशिष्ट गटाशी किंवा समविचारी लोकांशी जोडून न घेता माझे ज्ञान सर्वांशी शेअर करेन, असे ममता यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

कोण आहेत ममता कुलकर्णी?

दरम्यान, ममता कुलकर्णीविषयी सांगायचं झालं, तर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, अनेक वर्ष त्या सिनेसृष्टीपासून दूर होत्या. आता त्या साध्वी बनल्या आहेत. 24 जानेवारी 2025 रोजी प्रयागराज महाकुंभमध्ये किन्नर आखाड्यातून संन्यास घेऊन ममता कुलकर्णीने साध्वी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, वर्षभरात त्यांनी अनेकदा धार्मिक कार्यक्रमात आपली भूमिका मांडली आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!