मुंबई : ‘बादशाहो’ सिनेमातील सनी लिओनीच्या ‘पिया मोरे’ या आयटम साँगचं मेकिंग रिलीज करण्यात आलं आहे. अभिनेता इम्रान हश्मीसोबत सनी लिओनीने आयटम साँग केलं असून, यात अभिनेता अजय देवगणही मुख्य भूमिकेत आहे.
मेकिंग व्हिडीओमध्ये दिग्दर्शक मिलन लुथ्रिया गाण्याच्या शूटदरम्यानच्या प्रवासाबद्दल सांगतात. “या आयटम साँगमध्ये कुठल्या अभिनेत्रीला घ्यायचा, याचा विचार सुरु होता. कारण समोर इम्रान हश्मीसारखा अभिनेता होता. अनेक अभिनेत्रींची नावं सूचवण्यात आली. मात्र, भूषण कुमार यांनी सनी लिओनीचं नाव सूचवलं.”, असे लुथ्रिया यांनी सांगितले.
“इम्रान म्युझिकल हिरो आहे, तर सनी लिओनी इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय आहे, हे कॉम्बिनेश आतापर्यंत कुणी समोर आणलं नाही. त्यामुळे सनीचं नाव लुथ्रिया यांना सूचवलं.”, असे भूषण कुमार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुदस्सार खान याने आयटम साँगचं दिग्दर्शन केलं आहे. तर इम्रान हश्मीसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद सनी लिओनीने व्यक्त केला आहे.
पाहा ‘पिया मोरे’चा मेकिंग व्हिडीओ :