Vicky Kaushal Mahavatar First Look Poster: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) छावा (Chhaava Movie) चित्रपटाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. अशातच आता त्याच्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'महावतार' असं विकी कौशलच्या आगामी चित्रपटाचं नाव असणार आहे. फक्त नावाचीच नाहीतर विक्कीच्या लूकची झलकही दाखवण्यात आली आहे. 'स्त्री' आणि 'स्त्री 2' या हॉरर-कॉमेडी चित्रपटांचे दिग्दर्शक दिनेश विजन दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच, 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.
विक्की कौशलच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, 'महावतार' असं नाव असणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक पोस्टरही समोर आला आहे. दिनेश विजन हा चित्रपट बनवत असून तो 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्की चिरंजीवी परशुरामची भूमिका साकारणार आहे. आगामी महावतार चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
चित्रपटाविषयी माहिती देताना मॅडॉक फिल्म्सनं (Maddock Films) ट्वीट केलं आहे. दिनेश विजन धर्माच्या चिरंतन योद्ध्याची कथा रुपेरी पडद्यावर जिवंत करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अमर कौशिक करणार आहेत. #महावतारमध्ये विक्की कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत दिसणार आहे. 2026 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार आहे.
विक्की कौशलच्या 'महाअवतार'चा फर्स्ट लूक पोस्टर
विक्की कौशलच्या 'महाअवतार'चा फर्स्ट लूक पोस्टर जारी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्की कौशल संजय लीला भन्साळींचा चित्रपट 'लव एंड वॉर' संपवल्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये 'महाअवतार'चं शुटिंग पूर्ण करणार आहे. प्री-प्रोडक्शनचं काम येत्या वर्षात जानेवारीपासून सुरु केलं जाणार आहे. 'लव एंड वॉर'नंतर विक्की कौशलला एक मेगा फीचर फिल्म साईन करायची होती आणि निर्माता दिनेश विजान विक्कीला हवी तशीच स्क्रिप्ट रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत.
डिसेंबरमध्ये रिलीज होऊ शकतो 'छावा'
विक्की कौशल अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. त्याच्या आगामी छावा चित्रपटाची प्रेक्षत आतुरतेनं वाट पाहात आहेत. गेल्या वर्षी 'सॅम बहादूर'मध्ये दिसून आला होता. त्यानंतर तो 'बॅड न्यूज'मध्ये हलक्या-फुलक्या कॉमेडी घेऊन आला होता. आता तो 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी माहाराजांची भूमिका साकारणार आहे. पुढच्या महिन्यात विक्कीचा छावा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.