London Misal: जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' (London Misal) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. येत्या  8 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव हे एका अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 


चित्रपटामधील कलाकार


चित्रपटात जगन्नाथरावांच्या भूमिकेत भरत जाधव दिसणार आहेत तर अदितीच्या भूमिकेत ऋतुजा बागवे,रावीच्या भूमिकेत रितिका श्रोत्री दिसणार आहे. गौरव मोरे आणि माधुरी पवार यांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.  


टीझरनं वेधलं लक्ष


'लंडन मिसळ' चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन बहिणींचं आयुष्य जग्गनाथरावांच्या एका नियमामुळे बदलून जातं  अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि रितिका श्रोत्री दोघीही टीझरमध्ये हटके अंदाजात दिसत आहेत. 'लंडन मिसळ' चित्रपटाच्या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


पाहा टीझर:






आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे.  श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे. 


'लंडन मिसळ' या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत, सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत तर सहयोगी निर्मात्या वैशाली पाटील या आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे तर पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे तर 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं 'लंडन मिसळ' चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे.  वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. प्रेक्षक 'लंडन मिसळ' या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


London Misal: मनोरंजनाची झणझणीत मेजवानी; गौरव मोरे, भरत जाधव यांचा 'लंडन मिसळ' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला