(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : 'इंडिया' आघाडीच्या सभेवर कंगनाची बोचरी टीका, ह्यांच्यासोबत कॉमेडी...
Kangana Ranaut : कंगनाने राजकीय मुद्यांवर सडेतोडपणे व्यक्त केली होती. आता कंगनाने इंडिया आघाडीच्या सभेवर बोचरी टीका केली.
Kangana Ranaut : देशभरात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणनीति आखण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला. या निमित्ताने विरोधी पक्षांच्या 'इंडिया आघाडी'ची मोठी जाहीर सभा पार पडली. या सभेवर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) टीका केली आहे. या लोकांसोबत अशा प्रकारची कॉमेडी नैसर्गिकपणे होते असे कंगनाने म्हटले.
कंगना रणौतने याआधीदेखील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. त्याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कौतुकदेखील केले होते. कंगनाने राजकीय मुद्यांवर सडेतोडपणे व्यक्त केली होती. आता कंगनाने इंडिया आघाडीच्या सभेवर बोचरी टीका केली.
काय झाले नेमकं?
मुंबईतील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेचे सूत्रसंचालन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करत होते. यावेळी त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) नेते दीपांकर भट्टाचार्य यांचा उल्लेख भ्रष्टाचर्याजी असा झाला. त्यावर कंगनाने टीका केली आहे.
कंगनाने काय म्हटले?
कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या भाषणा दरम्यानचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहीले आहे. कंगनाने म्हटले की, ह्यांच्यासोबत अशी कॉमेडी नैसर्गिकपणे होते. जसं की कोणी कॉमेडीच्या एका खलनायकी व्यक्तीरेखेला स्क्रिप्ट लिहून दिली असावी.
View this post on Instagram
मागील काही वर्षापासून कंगनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. नुकताच प्रदर्शित झालेला तेजस चित्रपटही तिकिटबारीवर अपयशी ठरला. आणीबाणीवर आधारीत कंगनाचा 'एर्मजन्सी' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.