2000 साली मिस युनिर्व्हस स्पर्धेत लारा दत्ताने दिलेला परफॉर्मन्स अभूतपूर्व होता. ब्यूटी पॅजंट स्पर्धांच्या 65 वर्षांच्या इतिहासात लाराने सर्वोच्च गुण मिळवले आहेत. लाराने जवळपास सर्वच परीक्षकांकडून 10 पैकी सरासरी 9.99 गुण मिळवले होते.
लाराने स्विमसूट कॉम्पिटिशनच्या इतिहासातील सर्वाधिक (9.44) गुण मिळवले होते. तर अखेरच्या मुलाखत फेरीत लाराने मिळवलेले गुण हे मिस युनिव्हर्सच्या इतिहासात कुठल्याही फेरीत कुठल्याही स्पर्धकाला मिळालेल्या गुणांपेक्षा जास्त होते.

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी लारा ही दुसरीच भारतीय ठरली. यापूर्वी 1994 मध्ये सुष्मिता सेनने हा मान पटकावला होता. विशेष म्हणजे लारानंतर अद्याप कुठल्याच भारतीय स्पर्धकाला मिस युनिव्हर्सचा किताब जिंकता आलेला नाही.