Toh Ti Ani Fuji : 'तो, ती आणि फुजी' (Toh Ti Ani Fuji) हा रोमॅंटिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठीतला प्रयोगशील दिग्दर्शक मोहित टाकळकर सांभाळणार आहे. भारत आणि जपानमध्ये घडणाऱ्या या प्रेमकहाणीमध्ये ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि मृण्मयी गोडबोले (Mrinmayee Godbole) मुख्य भूमिकेत आहेत.


ललित आणि मृण्मयीची जोडी याआधी 'चि. व चि. सौ. का' या सिनेमात बघायला मिळाली होती. हा सिनेमा तब्बल 100 दिवस सिनेमागृहात गर्दी खेचत होता. 'ती, तो आणि फुजी' या सिनेमाकडून देखील याच अपेक्षा आहेत.


'ती, तो आणि फुजी' या सिनेमाची कथा एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या दोन पात्रांभोवती फिरते. पात्रांच्या वैयक्तिक आशा आकांक्षा, त्यांची वेगवेगळी जीवनमुल्यं आणि एकमेकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा यामुळे त्यांच्या नात्याचा कडवट शेवट होतो. पण पुन्हा सात वर्षांनी ही दोन पात्रं अनपेक्षितपणे एकमेकांसमोर येतात. त्यावेळी त्यांच्यासमोर असतात एकमेकांची वेगळ्या वाटेवरची आयुष्यं आणि त्यामुळे तयार झालेल्या नव्या अडचणी.






सिनेमासंदर्भात इरावती म्हणाली की,"आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याला मनापासून हवं असलेलं प्रेम निसटून गेलेलं असतं आणि आपण सतत मागे बघून त्या प्रेमाच्या कडू-गोड आठवणींमध्ये रमत असतो. मला वाटतं की, हा सिनेमा बघून प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या अपयशी ठरलेल्या पण उत्कट असणाऱ्या प्रेमाची आठवण उफाळून येईल."


'तो, ती आणि फुजी'चं चित्रिकरण पुणे, कोलाड, टोकियो, क्योटो आणि माउंट फुजी इथे होणार आहे. दोन विभिन्न संस्कृती असणाऱ्या देशांचं सौंदर्य टिपण्यासाठी, या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी दोन वेगळे सिनेमॅटोग्राफर्स असणार आहेत.


प्लॅटून वन फिल्म्स' आणि ‘क्रेझी अँट्स प्रॉडक्शन’ निर्मित, 'तो, ती आणि फुजी' हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण देशभरातल्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल.


संबंधित बातम्या


Ekda Kaay Zala : गोष्टी सांगणाऱ्या माणसाची अनोखी गोष्ट; 'एकदा काय झालं' सिनेमाचा ट्रेलर आऊट


Samaara Movie : ‘समायरा’ उलगडणार एका असाधारण प्रवासाची गोष्ट; 26 ऑगस्टला होणार रिलीज