Kranti Redkar: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. क्रांतीनं आता दिग्दर्शनात देखील पदार्पण केलं आहे. तिनं दिग्दर्शित केलेला 'रेनबो' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. नुकतीच क्रांतीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली. या पोस्टला क्रांतीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
क्रांतीची पोस्ट
क्रांतीनं नुकताच सोशल मीडियावर तिचे पती समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. क्रांतीनं या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं. क्रांतीनं फोटो शेअर करुन लिहिलं, 'जेव्हा ते आमच्या सेटला भेट देण्यासाठी येतात. समीर वानखेडे, थँक्यू, मला यामुळे स्पेशल वाटले. प्रेम हे फेरारी आणि लॅम्बोर्गिनीमुळे बनत नसते. माझ्यासाठी हे प्रेम आहे.' क्रांतीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. क्रांतीच्या पोस्टला काही नेटकऱ्यांनी लाइक केलं असून काहींनी कमेंट्स देखील केल्या आहेत.
क्रांतीच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती
क्रांतीनं शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. तिच्या पोस्टला जवळपास 26 हजार नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. तर या पोस्टला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'फोटो', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं क्रांतीनं शेअर केलेल्या फोटोला केली. तर दुसऱ्या युझरनं कमेंट करत लिहिलं, 'ब्युटिफुल कपल'
क्रांतीनं 2017 मध्ये समीर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. करार, जत्रा, पिपाणी, मर्डर मिस्ट्री या चित्रपटांमध्ये क्रांतीनं काम केलं. क्रांतीच्या 'कोंबडी पळाली' या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
समीर वानखेडे यांच्या कामाचा पत्नी क्रांती रेडकरला अभिमान; म्हणाली...