Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) 'किसी का भाई किसी का जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाच्या माध्यमातून दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. दबंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण रिलीजआधीच या सिनेमातील 'यंतम्मा' हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. दक्षिण भारतीयांनी या गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 


'यंतम्मा' हे गाणं गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात सलमान खान, व्यंकटेश आणि राम चरण साऊथ लुकमध्ये डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य संस्कृतीची चेष्ठा केल्यामुळे दक्षिण भारतातील मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे. 


'यंतम्मा' या गाण्यात सलमानने परिधान केलेल्या पोशाखाला वारंवार 'लुंगी' असे म्हटलं आहे. पण हा पोशाख दक्षिण भारतातील पुरुष मंडळींचा आवडता पोशाख आहे. याला 'धोती' किंवा 'वेष्टि' असं म्हटलं जातं. या पोशाखाची समाजात किंमत आहे. या पोशाखाचा चुकीच्या पद्धतीने वापर करू नये. 


माजी क्रिकेटर लक्ष्मण शिवारामकृष्णनने 'किसी का भाई किसी का जान' या सिनेमातील 'यंतम्मा' या गाण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने लिहिलं आहे,"यंतम्मा' हे गाणं चांगलं नाही. या गाण्याच्या माध्यमातून दक्षिण भारतीय संस्कृतीचा कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही लुंगी नाही धोती आहे. हा एक चांगला पोशाख असून सिनेमात त्याला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. 


नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त


बॉलिवूड सिनेमांत नेहमीच दाक्षिणात्य संस्कृतीला कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सलमानच्या 'किसी का भाई किसी का जान' या सिनेमातील 'यंतम्मा' हे गाणं त्याचं ताजं उदाहरण आहे. बॉलिवूडचे निर्माते जाणूनबुजून अशा पद्धतीचे सिनेमे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका नेटकऱ्याने तर लिहिलं आहे,"सेन्सॉर बोर्डाने संस्कृतीचं चुकीचं चित्रण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिनेमांसाठी खास नियम बनवायला हवेत". 


'किसी का भाई किसी का जान' कधी होणार रिलीज? 


'किसी का भाई किसी का जान' हा सिनेमा येत्या 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सलमान खान, व्यंकटेश, पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा 'वीरम' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. आधी या सिनेमाचं नाव 'भाईजान' होतं. पण नंतर या सिनेमाचं नाव 'किसी का भाई किसी का जान' ठेवण्यात आलं. 


संबंधित बातम्या


Ram Charan: 'माझं स्वप्न पूर्ण झालं'; सलमानसोबत ‘येंतम्मा’ गाण्यावर डान्स केल्यानंतर राम चरणची प्रतिक्रिया