मुंबई: उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांना बंदी घाला, त्यांना भारतात राहू देऊ नका, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता अभिनेता आमीर खानची पत्नी किरण रावने आपलं मत व्यक्त केलं आहे.


पूल बनवून आपल्या कामाने माणसं जोडणं हे कलाकारांचं काम आहे, अशी प्रतिक्रिया किरण रावने दिली आहे.

किरण राव या मुंबई अॅकॅडमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच 'मामी'च्या चेअरमन आहेत.

'मामी'मध्ये पाकिस्तानी सिनेमा 'जागो हुआ सवेरा'च्या प्रस्तावित स्क्रीनिंगला विरोध होत आहे.  मात्र या समस्येतूनही सुटका होईल, असा विश्वास किरण राव यांना आहे.

"सध्या कसोटीचा काळ आहे. सर्वजण भावनिक आहेत, त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. कोणताही देश असो, माणसं जोडणं हे कलेचं काम आहे. कलाकार म्हणून सामंजस्य निर्माण करणं हे आमचं काम आहे" असं किरण रावने म्हटलं आहे.

याशिवाय सीमेवर जवान शहीद होत आहेत, याच्याविरोधात आम्ही आहोच. पण क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक कम्युनिटीचे सदस्य या नात्याने, पूल बनवून माणसं जोडणं हे आमचं काम आहे, असंही किरण राव यांनी सांगितलं.

मुंबईत 20 ऑक्टोबरपासून 'मामी' महोत्सवाला सुरुवात होत असून 54 देशातील 180 सिनेमे दाखवण्यात येणार आहेत.

दरम्यान, 'जागो हुआ सवेरा'चं स्क्रीनिंग रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

काही दिवस मुंबई सोड, आमीरचा पत्नी किरणला सल्ला 

पत्नीलाही देशाची प्रतिष्ठा कळू द्या, राम माधव यांचा आमीरवर निशाणा 

आमीरची पत्नी किरण रावची पोलिसात धाव